कोलकाता - आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी आज कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव होत आहे. अंतिम निवडलेल्या ३३८ खेळाडूंवर बोली लावण्यात येणार असून यातील फक्त ७३ खेळाडूंचाच लिलाव आज होणार आहे, कारण सगळ्या ८ संघाकडे फक्त ७३ खेळाडू घेऊ शकतील, एवढाच कोटा शिल्लक आहे. या लिलावापूर्वी आमचे 'ईटीव्ही भारत' क्रीडा संपादक दिपांशू मदन यांनी इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसर याच्याशी चर्चा केली. पाहा खास व्हिडिओ...
माँटीने चर्चेदरम्यान सांगितले की, इंग्लंड कर्णधार इयान मॉर्गनवर फ्रेंचायझी बोली लावण्यासाठी उत्सुक असतील. याशिवाय इंग्लंडचे सॅम करन आणि टॉम करन या बंधूवरही मोठी बोली लागू शकते.