नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने खूप पाठिंबा दर्शवला होता, असा खुलासा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला आहे. रैना आणि युवराज हे दोघेही २०११च्या विश्वकरंडक विजेत्या संघाचे सदस्य होते.
युवराजने २०११ विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी रैना आणि युसुफ पठाण यांच्यातील निवडीबद्दल मोठा खुलासा केला आहे. युवी म्हणाला, “त्यावेळी रैनाला जास्त पाठिंबा मिळाला कारण धोनी त्याच्या सोबत होता. प्रत्येक कर्णधाराचे आवडते खेळाडू असतात आणि मला वाटते की त्यावेळी माहीने रैनाला साथ दिली”
युवी पुढे म्हणाला, “त्यावेळी युसूफ शानदार खेळत होता. मीसुद्धा चांगली कामगिरी करत होतो आणि विकेट घेत होतो, रैना मात्र चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्यावेळी संघात डावखुरा फिरकी गोलंदाज नव्हता आणि मी विकेटही घेत होतो. म्हणून त्यांच्याकडे पर्याय नव्हता.”
धोनी कर्णधार होता तोपर्यंत रैना संघाचा नियमित सदस्य होता. रैनाने आपला शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.