मोहाली - सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने ६ विकेट राखून रोमांचक विजय मिळवला. पंजाबकडून सलामीवीर लोकेश राहुलने ५३ चेंडूत नाबाद ७१ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राहुलने केलेल्या तडाखेबंद फलंदाजीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला की, सामना संपवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि आतापर्यंत ही स्पर्धा माझ्यासाठी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत मी दडपणाखाली होतो, मात्र तरीही मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतला आणि संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी झालो. त्यामुळे मी अतिशय आनंदीत असल्याचे राहुल म्हणाला.
-
He started off well and he finished off even better. 🔝
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) April 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tussi chaa gae, @klrahul11 praa! 🙌#SaddaPunjab #KXIPvSRH #KXIP #VIVOIPL pic.twitter.com/0p2x6Wm325
">He started off well and he finished off even better. 🔝
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) April 8, 2019
Tussi chaa gae, @klrahul11 praa! 🙌#SaddaPunjab #KXIPvSRH #KXIP #VIVOIPL pic.twitter.com/0p2x6Wm325He started off well and he finished off even better. 🔝
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) April 8, 2019
Tussi chaa gae, @klrahul11 praa! 🙌#SaddaPunjab #KXIPvSRH #KXIP #VIVOIPL pic.twitter.com/0p2x6Wm325
मोहालीच्या आय.एस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला निर्धारीत २० षटकात ४ गडी गमावत १५० धावा केल्या होत्या. सनरायझर्सने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला सुरुवातीलाच गेलच्या रुपात मोठा धक्का बसला मात्र, लोकेश राहुल (७१) आणि मयांक अग्रवाल (५५) यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे पंजाबने अखेरच्या षटकामध्ये १ चेंडू बाकी असताना रोमहर्षक विजय मिळवला.