मुंबई - ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका ही क्रिकेटची सर्वात मोठी आणि मालिका समजली जाते. या मालिकेच्या सामन्यादरम्यान स्टेडियम जवळजवळ हाऊसफुल्ल असते. अशा ऐतिहासिक मालिकेत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी करण्याची इच्छा असते. मग तो फलंदाज असो, गोलंदाज असो की क्षेत्ररक्षक. या दोन्ही संघातील खेळाडूंनी शानदार कामगिरी करत या मालिकेला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. अॅशेसमध्ये क्षेत्ररक्षणादरम्यान, खेळाडूंनी अनेक अप्रतिम झेल टिपले आहेत. अशाच सुरेश झेलचा व्हिडिओ इंग्लंडने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.
-
Ashes cricket ➕ insane catches 🔥
— England Cricket (@englandcricket) April 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
What's your favourite Ashes catch? pic.twitter.com/kyUHa23ZCw
">Ashes cricket ➕ insane catches 🔥
— England Cricket (@englandcricket) April 6, 2020
What's your favourite Ashes catch? pic.twitter.com/kyUHa23ZCwAshes cricket ➕ insane catches 🔥
— England Cricket (@englandcricket) April 6, 2020
What's your favourite Ashes catch? pic.twitter.com/kyUHa23ZCw
१८८२-८३ साली सुरू झालेल्या या मालिकेचे सामने पाहण्यासाठी चाहते हजारो किलोमीटर दूर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला जातात. अॅशेसच्या १३७ वर्षाच्या इतिहासात अनेक शानदार सामने झाले आहेत. गेल्या १५ वर्षात अॅशेसमध्ये अशी कामगिरी झाली आहे जी याआधी कधीच पाहायला मिळाली नाही. यामुळेच कसोटी क्रिकेट देखील वेगळ्या उंचीवर पोहोचले.
२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेली अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. पण इंग्लंडला अॅशेस आपल्याकडे कायम राखता आली नाही. कारण ऑस्ट्रेलियाने २०१७-१८ ची अॅशेस मालिका जिंकली होती आणि गतविजेते म्हणून मालिका बरोबरीत सुटूनही अॅशेस ऑस्ट्रेलियाकडे कायम राहिली. महत्वाचे म्हणजे, १९७२ नंतर म्हणजे ४७ वर्षांत प्रथमच अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. याआधी ४७ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्येच झालेली मालिका बरोबरीत सुटली होती.
हेही वाचा - १५ एप्रिलनंतरही आयपीएल होण्याची शक्यता नाहीच - राजीव शुक्ला
हेही वाचा - आवडीचा आहार एकदाच करायचा, भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर अॅपद्वारे नजर