मॅनचेस्टर - भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर २०२१ रॉयल लंडन कपमध्ये इंग्लंडचा काउंटी संघ लंकाशायरकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याने लंकाशायर क्लबशी करार केला आहे.
लंकाशायर क्लबने या संदर्भात ट्विट केले आहे. यात त्यांनी, २०२१ रॉयल लंडन कपसाठी विदेशी खेळाडू म्हणून भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरशी करार केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचे म्हटलं आहे.
-
✍️ 𝓢𝓱𝓻𝓮𝔂𝓪𝓼 𝓘𝔂𝓮𝓻
— Lancashire Cricket (@lancscricket) March 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We're excited to announce the signing of Indian international batsman @ShreyasIyer15 for this summer's @RoyalLondonCup 🤩 🇮🇳
🌹 #RedRoseTogether @MCRIndia
">✍️ 𝓢𝓱𝓻𝓮𝔂𝓪𝓼 𝓘𝔂𝓮𝓻
— Lancashire Cricket (@lancscricket) March 22, 2021
We're excited to announce the signing of Indian international batsman @ShreyasIyer15 for this summer's @RoyalLondonCup 🤩 🇮🇳
🌹 #RedRoseTogether @MCRIndia✍️ 𝓢𝓱𝓻𝓮𝔂𝓪𝓼 𝓘𝔂𝓮𝓻
— Lancashire Cricket (@lancscricket) March 22, 2021
We're excited to announce the signing of Indian international batsman @ShreyasIyer15 for this summer's @RoyalLondonCup 🤩 🇮🇳
🌹 #RedRoseTogether @MCRIndia
क्लबने सांगितलं की, 'भारतासाठी २१ एकदिवसीय आणि २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला श्रेयस ५० षटकाच्या मालिकेसाठी ओल्ड ट्रॅफर्डला येणार आहे. तो स्पर्धेला सुरूवात होण्याआधी १५ जुलैला येथे पोहोचेल. तो संघासोबत एक महिना राहिलं.'
लंकाशायरचे पदाधिकारी पॉल अलॉट यांनी सांगितलं की, 'श्रेयस नव्या पिढीचा भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आहे.'
लंकाशायर क्लबशी करार झाल्यानंतर श्रेयसने आनंद व्यक्त केला. त्याने, इंग्लंड क्रिकेटमध्ये लंकाशायर हा नावाजलेला क्लब आहे. ज्याचा संबंध भारतीय क्रिकेट सोबत नेहमी आलेला आहे. लंकाशायर क्लबकडून खेळलेल्या फारूख इंजिनियर, सौरभ गांगुली आणि लक्ष्मण या महान खेळाडूंचा वसा पुढे घेऊन जाताना, मला आनंद वाटत आहे, असे सांगितले.
दरम्यान, लंकाशायर क्लबकडून याआधी फारुख इंजिनियर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण, मुरली कार्तिक आणि दिनेश मोंगिया यांनी क्रिकेट खेळलं आहे. यात आता श्रेयसच्या नावाची भर पडली आहे.
हेही वाचा - जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर पडल्यास.., 'या' ३ गोलंदाजांवर असेल राजस्थानची नजर
हेही वाचा - Ind vs Eng ODI Series : भारत-इंग्लंड १०० वेळा आमनेसामने, कोण ठरलं वरचढ