जोहान्सबर्ग - जो डेनलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लडने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून पराभव केला. इंग्लंडने या विजयासह आफ्रिकेविरुध्दची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. पहिला सामना आफ्रिकेने जिंकला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक (६९) आणि डेव्हिड मिलर (६९) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर ७ बाद २५६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून आदिल रशिदने ३, तर साकिब महमूद आणि मोईन अलीने १ गडी बाद केला.
आफ्रिकेने विजयासाठी दिलेले २५७ धावांचे आव्हान इंग्लंडने ४३.२ षटकात ८ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडकडून जो डेनलीने (६६), जो रूटने (४९), जॉनी बेअरस्टोव (४३)आणि टी बॅटन (३२) यांनी महत्वपूर्ण खेळी करून विजयात मोलाची भूमिका निभावली. ब्यूरन सिम्पाला आणि तरबेज शम्सीने प्रत्येकी १ गडी बाद केला. तीन गडी बाद करणारा आदिल रशिद सामनावीर ठरला. तर क्विंटन डी कॉकला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - अंडर-१९ विश्वचषक : भारतावर मात करत बांगलादेशने पहिल्या-वहिल्या विश्वकरंडकावर कोरले नाव
हेही वाचा - महिला क्रिकेटरच्या विनंतीवर सचिन मैदानात, मग पुढे काय घडलं... पाहा व्हिडिओ