साऊथम्प्टन - एजेस बाऊल येथे सुरू झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने ५ बाद १२६ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी सुरू झालेल्या पावसाने आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाक फलंदाजांना स्थिर होऊ दिले नाही. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पाऊस सुरू झाल्याने पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. या कसोटीत नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. पहिल्या कसोटीत शतक झळकावलेला शान मसूद एक धावा काढून बाद झाला. त्यानंतर, आबिद अली आणि अझर अली यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर पुन्हाल पाऊस सुरू झाला. पावसाच्या व्यत्ययानंतर पाकिस्तानने झटपट तीन बळी गमावले. आबिद अलीने ७ चौकारांसह ६० धावांची खेळी केली. खेळ थांबला तेव्हा बाबर आझम २५ आणि मोहम्मद रिझवान ४ धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून अँडरसनने २ तर, स्टुअर्ट ब्रॉड, सॅम करन आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी एक बळी टिपला.
इंग्लंडची प्लेईंग XI -
रोरी बर्न्स, डोमिनिक सिब्ले, जॅक क्रॉले, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जोस बटलर (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, सॅम करन, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
पाकिस्तानची प्लेईंग XI -
शान मसूद, अबिद अली, अझर अली (कर्णधार), बाबर आझम, असद शफीक, फवाद आलम, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), यासिर शाह, मोहम्मद अब्बास, शाहिन अफरिदी, नसीम शाह