ETV Bharat / sports

कसोटी मालिकेत वरचढ कोण? भारत की इंग्लंड, जाणून घ्या आकडेवारी - इंग्लंडचा भारत दौरा २०२१ न्यूज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे. या निमित्ताने आपण दोन्ही संघांची एकमेकांसमोर आतापर्यंतची कसोटी मालिकेत कशी कामगिरी राहिली आहे, हे पाहणार आहोत.

england vs india head to head in test record
कसोटी मालिकेत वरचढ कोण? भारत की इंग्लंड, जाणून घ्या आकडेवारी
author img

By

Published : Jan 30, 2021, 11:23 AM IST

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे. उभय संघातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. या निमित्ताने आपण दोन्ही संघांची एकमेकांसमोर आतापर्यंतची कसोटी मालिकेत कशी कामगिरी राहिली आहे, हे पाहणार आहोत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण ३३ कसोटी मालिका खेळण्यात आल्या आहेत. यात इंग्लंड संघाने १९ मालिकेत भारताचा पराभव केला आहे. तर १० मालिकेत भारताला विजय मिळवता आला आहे.

उभय संघात आतापर्यंत एकूण १२२ कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी ४७ सामने हे इंग्लंडने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने २६ सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. तसेच ४९ सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

भारत आणि इंग्लंड चेन्नईमध्ये ९ वेळा आमनेसामने झाले आहेत. यात ५ सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले आहे. तर इंग्लंडने ३ सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित १ सामना हा अनिर्णित राहिला आहे.

असे आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक –

पहिला कसोटी सामना – ५ ते ९ फेब्रुवारी – चेन्नई (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)

दुसरा कसोटी सामना – १३ ते १७ फेब्रुवारी – चेन्नई (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)

तिसरा कसोटी सामना – २४ ते २८ फेब्रुवारी – अहमदाबाद (दिवस-रात्र) भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरु होईल.

चौथा कसोटी सामना – ४ ते ८ मार्च – अहमदाबाद (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)

असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, ऋषभ पंत , वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

असा आहे इंग्लंडचा संघ –

जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, झॅक क्रॉवली, डॅन लॉरेन्स, ऑलिव्हर स्टोन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.