ETV Bharat / sports

इंग्लंडचे भारत दौरे : दारुण पराभव ते २६/११ हल्ल्यातील शहिदांना वाहिलेला कसोटीविजय - इंग्लंडचा भारत दौरा इतिहास न्यूज

नवीन वर्षात इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला आहे. या दौऱ्यात चाहत्यांना ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मेजवानी मिळणार आहे.

england and india cricket history
इंग्लंडचे भारत दौरे
author img

By

Published : Jan 30, 2021, 9:59 PM IST

मुंबई - बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत 'नवख्या' भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला २-१ असे लोळवले. आता नवीन वर्षात इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला आहे. या दौऱ्यात चाहत्यांना ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मेजवानी मिळणार आहे. क्रिकेटचा 'गुरू' असेलेला इंग्लंडचा संघ आत्तापर्यंत १४ वेळा भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे. आज आपण याच दौऱ्यांची माहिती घेणार आहोत.

इंग्लंडचा पहिला भारत दौरा (१९३३-३४) :

१९३३-३४मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाने प्रथमच भारत दौरा केला. डग्लस जॉर्डिन यांच्या नेतृत्वातील इंग्लंडने कसोटी मालिकेत भारताला २-१ असे पराभूत केले होते. सी. के. नायडू हे तत्कालिन भारतीय कसोटी संघाचे कर्णधार होते. इंग्लंडने मुंबईच्या जिमखाना स्टेडियमवर पहिला कसोटी सामना ९ गडी राखून जिंकला, तर कोलकाता येथे खेळलेला दुसरा सामना अनिर्णित राहिला. तिसरा सामना इंग्लंडने चेन्नई येथे तब्बल २०२ धावांनी जिंकला.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा दुसरा भारत दौरा (१९५१-५२) :

१९५१-५२मध्ये निगेल हॉवर्ड यांच्या नेतृत्वात इंग्लंडने दुसऱ्यांदा भारत दौरा केला. यावेळी दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली, जी १-१ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेचे पहिले तीन सामने दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे खेळवण्यात आले होते. यानंतर कानपूर येथे खेळलेला चौथा कसोटी सामना इंग्लंडने ८ गडी राखून जिंकला, तर चेन्नईमध्ये खेळलेला शेवटचा सामना भारतीय संघाने एक डाव आणि आठ धावांनी जिंकला. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातही हा पहिला विजय होता. विजय हजारे यांच्या नेतृत्वात टीम इंडियाला हा विजय मिळवता आला होता. इंग्लंडविरुद्ध मालिका अनिर्णित राखण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा तिसरा भारत दौरा (१९६१-६२) :

१९६१-६२मध्ये इंग्लंड संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला भेट दिली आणि भारताने ही मालिका २-० ने जिंकली. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ होती. यजमान संघाने नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या नेतृत्वात हा इतिहास रचला होता. टेड डेक्स्टर यांच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ भारतात आला होता. मुंबई, कानपूर आणि दिल्ली येथे खेळले गेलेले तीन कसोटी सामने बरोबरीत सुटले होते. त्यानंतर भारताने कोलकाता कसोटी १८७ आणि चेन्नई कसोटी १२८ धावांनी जिंकली.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा चौथा भारत दौरा (१९६३-६४) :

१९६३-६४मध्ये माइक स्मिथ यांच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या संघाने पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताला भेट दिली होती. तर, टीम इंडियाची कमान मन्सूर अली खान पटौदी यांच्या ताब्यात होती. मालिकेत खेळले गेलेले पाचही सामने बरोबरीत सुटले होते. इंग्लंड संघाला विजयाची नोंद करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर भारतीय संघाचे खूप कौतुक करण्यात आले होते.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा पाचवा भारत दौरा (१९७२-७३) :

१९७२-७३मध्ये टोनी लुईस यांच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला भेट दिली. भारतीय संघाची कमान अजित वाडेकर यांच्या हाती होती. इंग्लंडने सहा गडी राखून मोठा विजय साकारत मालिकेची दणदणीत सुरुवात केली. मात्र, भारतानेही चोख प्रत्युत्तर करत या पुढचे दोन्ही सामने खिशात टाकले. भारताने प्रथम कोलकाता कसोटी सामना २८ तर चेन्नई कसोटी सामना ४ गडी राखून जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ने पुढे होता. तर उर्वरित दोन कसोटी बरोबरीत सुटल्या. लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर आणि बिशनसिंग बेदी यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना नामोहरम केले.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा सहावा भारत दौरा (१९७६-७७) :

१९७६-७७ हे वर्ष इंग्लंडसाठी खास ठरले. टोनी ग्रेग यांच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला भेट दिली. मालिकेचे तीन सामने जिंकत ग्रेगसेनाने तब्बल ४३ वर्षानंतर भारतात कसोटी मालिकाविजय साकारला. दिल्लीतील कसोटी इंग्लंडने एक डाव आणि २५ धावांनी जिंकली. कोलकात्यातील कसोटी पाहुण्यांनी १० गडी राखून जिंकली. तर चेन्नईतील कसोटीत तब्बल २०० धावांनी इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला. या पराभवानंतर बंगळुरूमध्ये भारताने विजयी पुनरागमन केले. भारताने ही कसोटी १४० धावांनी जिंकली. उभय संघातील शेवटची मुंबई कसोटी बरोबरीत सुटली. या मालिकेत बिशनसिंग बेदी यांनी भारताची कमान सांभाळली होती.

इंग्लंडचा सातवा भारत दौरा (१९८१-८२) :

भारत आणि इंग्लंड यांच्यात प्रथमच सहा कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात ही मालिका भारताने १-० अशी जिंकली. उर्वरित सर्व सामने अनिर्णित सुटले. गावसकर अँड कंपनीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर इंग्लंडला १३८ धावांनी पराभूत करून एकमेव कसोटी जिंकली. या मालिकेत कर्णधार सुनील गावसकर यांनी टीम इंडियाकडून सर्वाधिक ५०० धावा केल्या. कपिल देव यांनीही अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंडला त्रास दिला होता. कपिल देव यांनी पाच सामन्यांत एकूण २२ खेळाडूंना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा आठवा भारत दौरा (१९८४-८५) :

१९८३चा वर्ल्डकप जिंकून भारताने संपूर्ण जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली होती. क्रिकेटच्या विश्वात भारताचे स्थान अधोरेखित झाले होते. १९८४-८५ मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताल आला. भारताकडून खूप अपेक्षा होती. मुंबईत खेळलेली पहिली कसोटी भारताने जिंकली, पण त्यानंतर इंग्लंडने चारपैकी दोन सामने जिंकून मालिका जिंकली. डेव्हिड गोव्हर यांच्या नेतृत्वात इंग्लंडने प्रथम कोलकाता कसोटी आठ गडी राखून जिंकली, त्यानंतर चेन्नईमध्ये एक डाव आणि २२ धावांनी विजय मिळविला. संघाच्या वतीने माइक गॅटिंग यांनी शानदार खेळ केला. त्यांनी संपूर्ण मालिकेत सर्वाधिक ९५.८३च्या सरासरीने ५७५ धावा केल्या.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा नववा भारत दौरा (१९९२-९३) :

१९९२-९३मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेली तीन कसोटी सामन्यांची मालिका भारतीय क्रिकेट संघ आणि चाहत्यांसाठी संस्मरणीय होती. हे सर्व सामने मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने जिंकले होते. कोलकाता येथे झालेल्या सामन्यात आठ गडी राखून, चेन्नई कसोटी एक डाव आणि २२ धावांनी आणि मुंबई कसोटीत एक डाव आणि १५ धावांनी जिंकली होती. मालिकेत अनिल कुंबळेने १९.८१च्या सरासरीने २१ बळी घेतले होते. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार ग्रॅहॅम गूच होता.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा दहावा भारत दौरा (२००१-०२) :

२००१-०२मध्ये इंग्लंडने नासिर हुसेनच्या नेतृत्वात भारताला भेट दिली आणि दोन्ही देशांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने १-० अशी जिंकली होती. मोहालीमधील कसोटी सामन्यात भारताने १० गडी राखून विजय मिळवला. मालिकेत सचिन तेंडुलकरने ३०७ धावा केल्या, तर अनिल कुंबळेने १९ फलंदाजांना माघारी धाडले.

इंग्लंडचा अकरावा भारत दौरा (२००५-०६) :

२००५-०६मध्ये इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेसाठी अँड्र्यू फ्लिंटॉफच्या नेतृत्वात भारताला भेट दिली. ही मालिका १-१ अशी संपुष्टात आली. त्यावेळी राहुल द्रविडच्या हाती भारताची कमान होती. मालिकेचा पहिला सामना अनिर्णित सुटला, तर मोहाली कसोटी भारताने ९ गडी राखून जिंकली. तर, शेवटच्या सामन्यात पाहुण्या संघाने भारताला २१२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा बारावा भारत दौरा (२००८-०९) :

२००८-०९मध्ये दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. हा मालिका भारताने १-० अशी जिंकून इतिहास रचला होता. मालिकेचा शेवटचा सामना चेन्नई येथे खेळला गेला. तेथे भारताने चार गडी गमावून ३८७ धावांचे लक्ष्य गाठले. हा विजय देखील भारतीय क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने चौथ्या डावात नाबाद १०३ धावा केल्या. भारताचा हा विजय त्यावर्षी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिक आणि मृतांना समर्पित केला गेला.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा तेरावा भारत दौरा (२०१२-१३) :

२०१२-१३मध्ये इंग्लंडचा संघ सर अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वात चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला. मालिकेचा पहिला सामना अहमदाबादमध्ये धोनी अँड कंपनीने ९ गड्यांनी जिंकला. या सामन्यानंतर इंग्लंडने आपली सर्व शक्ती पणाला लावत पुढील दोन्ही सामने जिंकले. अहमदाबादमधील पराभवानंतर इंग्लंडने पहिली मुंबई कसोटी १० गडी राखून जिंकली आणि त्यानंतर कोलकाता कसोटी ७ गडी राखून जिंकली. अंतिम सामना अनिर्णित राहिला आणि इंग्लंडने मालिका २-१ने जिंकली. या मालिकेत कुकने चार सामन्यात ५६२ धावा केल्या.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा चौदावा भारत दौरा (२०१६-१७) :

२०१६-१७मध्येही इंग्लंड संघ सर अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वात पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला होता आणि ही मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ४-० अशी जिंकली. पहिला सामना अनिर्णित राहिला, त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात भारताने २४६ धावांनी विजय मिळवला. मोहाली कसोटीत भारताला ८ गडी राखून विजय मिळाला. तर, मुंबईत भारताने इंग्लंडवर एक डाव आणि ३६ धावांनी विजय मिळवला. पुण्यात भारताने इंग्लंडला ३ गडी राखून पराभव केले. या मालिकेत आर. अश्विन २८ आणि रवींद्र जडेजाने २८ विकेट्स घेतल्या.

england tour of india history
इंग्लंडचा भारत दौरा

हेही वाचा - मोठ्या पराक्रमापासून विराट फक्त १४ धावा दूर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.