ETV Bharat / sports

IND VS ENG : पहिल्या कसोटीआधी इंग्लंडला सरावासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस

भारतात आल्यानंतर इंग्लंड खेळाडूंसह त्यांच्या सपोर्ट स्टापला सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या कारणाने त्यांना पहिल्या कसोटीआधी केवळ तीन दिवस सरावासाठी मिळणार आहेत.

england squad will get three days to train before first test in chennai
IND VS ENG : पहिल्या कसोटीआधी इंग्लंडला सरावासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस
author img

By

Published : Jan 25, 2021, 1:02 PM IST

लंडन - इंग्लंडचा संघ श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतात दाखल होणार आहे. भारतात आल्यानंतर इंग्लंड खेळाडूंसह त्यांच्या सपोर्ट स्टापला सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या कारणाने त्यांना पहिल्या कसोटीआधी केवळ तीन दिवस सरावासाठी मिळणार आहेत.

श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतलेले इंग्लंडचे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्स हे रविवार रात्री भारतात दाखल झाले आहेत. त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील सहा दिवसांत त्यांची तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, त्यांना सरावाची परवानगी मिळणार आहे. तिघांनाही पाच दिवस सराव करण्यासाठी मिळणार आहेत.

इंग्लंडचा संघ जेव्हा श्रीलंका दौऱ्यासाठी पोहोचला, तेव्हा त्यांना ४८ तासांनंतर सरावाची परवानगी मिळाली होती. अशात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याला क्वारंटाइन करण्यात आले होते.

दरम्यान, उभय संघातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. चार सामन्यातील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. हे सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात येतील, असे तमिळनाडू क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुषंगाने ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. यात भारतीय संघ कशी कामगिरी करणार याची उत्सुकता लागलेली आहे.

हेही वाचा - IND VS ENG : प्रेक्षकांसाठी मैदानाची दारे बंद; चेन्नईतील कसोटी सामने विनाप्रेक्षक होणार

हेही वाचा - ..म्हणून कुलदीपच्या जागी सुंदरला निवडलं, अजिंक्यने सांगितलं कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.