ETV Bharat / sports

ENGvsWI : चौथ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 219 धावांची आघाडी

इंग्लंडकडे आता 219 धावांची आघाडी असून कर्णधार जो रूट 8 तर, बेन स्टोक्स 16 धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडीजचा पहिला डाव 287 धावांत संपुष्टात आला.

author img

By

Published : Jul 20, 2020, 11:55 AM IST

England lead by 219 runs against west indies in second test
ENGvsWI : चौथ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 219 धावांची आघाडी

मँचेस्टर - वेस्ट इंडिजविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत इंग्लंडने दुसर्‍या डावात 2 बाद 37 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडकडे आता 219 धावांची आघाडी असून कर्णधार जो रूट 8 तर, बेन स्टोक्स 16 धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडीजचा पहिला डाव 287 धावांत संपुष्टात आला. विंडीजच्या फलंदाजांनी फॉलोऑनची नामुष्की टाळली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे ही कसोटी बरोबरीत सुटण्याची चिन्हे आहेत. चौथ्या दिवशी विंडीजने 1 बाद 32 धावांवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. क्रेग ब्रेथवेटने 75, ब्रुक्सने 68 तर, रोस्टन चेसने 51 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सने 3, सॅम करनने 2 तर, डॉम बेस आणि स्टोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला.

तत्त्पूर्वी, नाणेफेक जिंकून विंडीजने इंग्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. यजमान इंग्लंडने आपला पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केला. बेन स्टोक्स (176) आणि डॉम सिब्ले (120) यांच्या 260 धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या उभारली. द्विशतकाकडे कूच करणारा स्टोक्स चहापानानंतर 4 धावा काढून बाद झाला. त्याने 356 चेंडूंचा सामना करत आणि 17 चौकार आणि दोन षटकार टोलवत 176 धावा केल्या. तर, सिब्लेने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. त्याने 312 चेंडूत शतक पूर्ण केले. 1990 पासून इंग्लंडचे हे पाचवे संथ शतक आहे.

संक्षिप्त धावफलक -

नाणेफेक - वेस्ट इंडिज (गोलंदाजी)

इंग्लंड पहिला डाव - 9 बाद 469 डाव घोषित

वेस्ट इंडिज पहिला डाव - सर्वबाद 287

इंग्लंड दुसरा डाव - 2 बाद 37 (चौथ्या दिवसअखेर)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.