लंडन - इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हीथर नाइटने राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस)मध्ये स्वयंसेवी म्हणून प्रवेश घेतला आहे. या महामारीबद्दल इंग्लंडमधील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नाईट प्रयत्न करणार आहे.
“स्वयंसेवक म्हणून मी एनएचएसमध्ये काम करणार आहे. जितकी मदत होईल तितकी मला मदत करायची आहे. माझा भाऊ आणि त्याचा साथीदार डॉक्टर आहेत आणि माझे काही मित्र एनएचएसमध्ये काम करतात. त्यामुळे ते किती कठोर परिश्रम करतात हे मला ठाऊक आहे”, असे नाईटने सांगितले.
ब्रिटिश माध्यमांच्या म्हणण्यानुसार, एनएचएस कार्यक्रमात १७००० हून अधिक लोक स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले आहेत.