साऊथम्प्टन - वेस्ट इंडिजविरूद्ध गमावलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला इंग्लंड संघात स्थान मिळाले नाही. या निर्णयाबद्दल खेद नसल्याचे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने म्हटले आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडला चार गड्यांनी मात देत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी 200 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने 6 गडी गमावत लक्ष्य गाठले. सामन्यानंतर स्टोक्स म्हणाला, "स्टुअर्ट ब्रॉड संघाबाहेर असल्याचा मला खेद नाही. आम्ही भाग्यवान आहोत की आपण त्याच्यासारख्या खेळाडूला बाहेर काढू शकलो. तो अजून संपलेला नाही. जर तो दुसर्या कसोटीत खेळला, तर मला आशा आहे की तो काही विकेट्ससह पुनरागमन करेल.''
कसोटीत इंग्लंडकडून 485 बळी घेणाऱ्या स्टोक्सने सांगितले होते, की पहिल्या सामन्यात अंतिम 11 मध्ये न निवडल्यामुळे मी निराश झालो आहे.
विंडीजविरूद्ध आव्हानाचा बचाव करताना इंग्लंडने काही संधी गमावल्या हे स्टोक्सने कबूल केले. तो म्हणाला, "दबाव हा वेगळा असतो. डोक्यात काहीतरी गडबड सुरू असते. अशा काही संधी होत्या, ज्यांचा आम्ही उपयोग केला नाही. इंग्लंडचे नेतृत्व करण्याचा मला आनंद झाला, पण हा रुटचा संघ आहे आणि मी त्याचे पुन्हा स्वागत करतो.''
मुलीच्या जन्मामुळे रूट या सामन्यात खेळला नाही. 16 जुलैपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होणार्या कसोटी सामन्यातून जो रूट संघात परतणार आहे.