मुंबई - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्चस्वाला जोरदार धक्का देत तो २०१९ सालचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनला आहे. 'विस्डन'ने बेन स्टोक्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरव केला आहे. दरम्यान, विराटने मागील सलग ३ वर्षे विस्डनचा सर्वोत्तम खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला आहे. हा एक विक्रम आहे.
विराट कोहली २०१६, २०१७ आणि २०१८चा विस्डनचा सर्वोत्तम खेळाडू आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षी विस्डनच्या सन्मान यादीच भारताच्या कोणत्याही पुरुष आणि महिला खेळाडूंना स्थान मिळवला आलेले नाही. स्टोक्सला पहिल्यादांच हा बहुमान मिळाला आहे.
बेन स्टोक्सने २०१९ विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये १५ धावा चोपल्या होत्या. यानंतर त्याने अॅशेस मालिकेतील हेंडिग्लेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्वश्रेष्ट खेळी केली. त्याने नाबाद १३५ धावांची खेळी करत इंग्लंडला एक विकेट राखून विजय मिळवून दिला होता.
विस्डन पुरस्काराची सुरूवात २००३ मध्ये झाली. यानंतर स्टोक्स हा पुरस्कार पटकावणारा इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी अॅड्रयू फ्लिंटॉफला २००५मध्ये हा सन्मान मिळाला होता.
विस्डनने महिला खेळाडूमध्ये ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. पेरीने अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तिने कँटरबरी कसोटीमध्ये शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना २२ धावांमध्ये ७ गडी बाद केले होते. तर टॉटन कसोटीत तिने पहिल्या डावात ११६ आणि दुसऱ्या डावात ७६ धावांची खेळी केली होती.
हेही वाचा - आफ्रिदीच्या ऑलटाईन इलेव्हनमध्ये 'ना ताळ आहे ना मेळ', एकाच भारतीयाचा समावेश
हेही वाचा - देशासाठी काय पण! कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी १५ वर्षीय खेळाडूने उचलले 'हे' पाऊल