ETV Bharat / sports

Cricket World Cup : पाकिस्तानचा इंग्लंडला 'दे धक्का'; १४ धावांनी शानदार विजय

author img

By

Published : Jun 3, 2019, 3:41 PM IST

Updated : Jun 4, 2019, 11:47 AM IST

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लडसमोर ३४९ धावांचे आव्हान उभारले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडला ९ बाद ३३४ धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंडसमोर पाकिस्तानने उभारला 348 धावांचा डोंगर

नॉटिंगहॅम - विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकांमध्ये 348 धावांचा डोंगर उभा केला. पाककडून बाबर आझम (६३), मोहम्मद हाफिझ (८४) आणि कर्णधार सर्फराझ अहमद (५५) यांनी शानदार अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. तर, सलामीवीर इमाम-उल-हकने ४४ आणि फखर झमानने ३६ धावा करत चांगली सुरुवात करुन दिली होती.

इंग्लंडचे गोलंदाज या सामन्यात विकेट्स घेण्यात यशस्वी झाले असले तरी, धावा रोखण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे पाकने ३०० धावांचा टप्पा अगदी सहज पूर्ण केला. इंग्लंडकडून गोलंदाज मोईन अली आणि क्रिस वोक्स यांनी प्रत्येकी ३ तर, मार्क वुडने २ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानने दिलेल्या ३४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. जेसन रॉय अवघ्या ८ धावा काढून शादाबच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर, जो रुट आणि बेअरस्टोने चांगली फलंदाजी केली. परंतु, वाहब रियाजने ही जोडी फोडली. कर्णधार मोर्गन या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. त्याला केवळ ९ धावाच करता आल्या.

मागील सामन्यात सामनावीर ठरलेला बेन स्टोक्सही मोठी खेळी करण्यात अपयशी झाला. तो केवळ १३ धावा काढून बाद झाला. ११८ धावांवर ४ बाद अशी बिकट स्थिती असताना जो रुट १०७ धावा आणि बटलरने १०३ धावा करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. परंतु, पाकिस्तानने टिच्चून गोलंदाजी करताना दोन्ही फलंदाजाला माघारी धाडत सामना निसटू दिला नाही. शेवटच्या काही षटकांत क्रिस वोक्सने फटकेबाजी करत इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या होत्या.परंतु, विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. या पराभवामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.

अशी होती दोन्ही संघाची Playing XI

  • पाकिस्तान संघ- सर्फराज अहमद (कर्णधार) इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, हसन अली, वहाब रियाज, मोहम्मद आमिर.
  • इंग्लंड संघ - ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, क्रिस वोक्स, मार्क वुड, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद.

Intro:Body:

sport

Conclusion:
Last Updated : Jun 4, 2019, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.