नई दिल्ली - चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयची नवनियुक्त वरिष्ठ निवड समिती समिती १९ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.
एका वृत्तानुसार, निवड समिती १९ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल बैठक घेऊन संघाची घोषणा करेल. यादरम्यान कर्णधार विराट कोहलीही हजर असणार आहे. चेतनशिवाय सुनील जोशी, देबाशिष मोहंती, हरविंदर सिंग आणि अबे कुरुविला हे निवड समितीमध्ये उपस्थित राहतील. संघाच्या निवडीदरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांचाही विचार केला जाईल. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराह आणि अश्विनला दुखापत झाली आहे.
भारतीय संघाला इंग्लंडबरोबर पहिली कसोटी ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान तर दुसरी कसोटी १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान खेळायची आहे. दोन्ही कसोटी सामने चेन्नईवर रंगणार आहेत. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौर्यावर असून तो २७ जानेवारीला चेन्नईसाठी रवाना होईल.
हेही वाचा - पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचे निवृत्तीच्या निर्णयावरून घूमजाव