लंडन - इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी त्यांच्या संलग्न क्रिकेट लीगसाठी 'आपत्कालीन कर्ज योजना' सुरू केली आहे. कोरोना संकटादरम्यान बोर्डाशी संबंधित स्पर्धांना (खुला गट आणि ज्युनियर लीग) व्याजाशिवाय कर्जे दिले जातील, असे ईसीबीने आपल्या संकेतस्थळावर म्हटले. क्रिकेटच्या कोलमडलेल्या वेळापत्रकासाठी ईसीबीने हा निर्णय घेतला आहे.
ईसीबीशी संलग्न असलेले किंवा काऊंटी क्रिकेट बोर्ड (सीसीबी), नॅशनल एशियन क्रिकेट कौन्सिल (एनएसीसी), नॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स (एनसीसी) आणि आफ्रो-कॅरिबियन क्रिकेट असोसिएशन (एसीसीए) यासह 2019 किंवा 2020 मध्ये भागीदारी असलेल्या लीग कर्जासाठी अर्ज करू शकतात.
ईसीबीचे निक प्रयाद म्हणाले, की नवीन आपत्कालीन कर्ज योजना सुरू केल्याने आम्हाला आनंद झाला आहे, जेणेकरून आम्ही या परिस्थितीत आमच्याशी संबंधित क्रिकेट लीगला मदत करू शकू.
ते पुढे म्हणाले, "हे चांगले आहे की या स्पर्धांना राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारकडून पाठिंबा मिळतो आहे. आम्ही इंग्लंड आणि वेल्समधील लीगला मदत करणार आहोत. 2020 मध्ये जे नुकसान होईल त्याची भरपाई आम्ही करू." या लीग मंडळाकडे 50 हजार पौंडपर्यंत कर्ज मागू शकतात.