ETV Bharat / sports

'धोनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळेल यात कोणतीही शंकाच नाही'

author img

By

Published : Dec 14, 2019, 5:53 PM IST

विश्वकरंडकानंतर धोनीने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तो अद्याप क्रिकेटपासून लांब आहे. धोनीच्या भविष्यासंदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह कर्णधार विराट कोहलीने आपले मत मांडले. पण आता धोनीचा आयपीएलमधील सहकारी आणि वेस्ट इंडीज संघाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आपले मत व्यक्त केले.

Dwayne Bravo said MS Dhoni will be there at T20 World Cup 2020
'धोनी टी-२० विश्व करंडक स्पर्धा खेळेल यात कोणतीही शंकाच नाही'

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्वकरंडक स्पर्धेनंतर मैदानात दिसला नाही. यामुळे अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. धोनी खेळणार की निवृत्ती घेणार याविषयीच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जमधील धोनीच्या एका सहकाऱ्याने, धोनी निवृत्ती घेणार नाही. तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळेल, असा विश्वास बोलून दाखवला.

विश्वकरंडकानंतर धोनीने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तो अद्याप क्रिकेटपासून लांब आहे. धोनीच्या भविष्यासंदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह कर्णधार विराट कोहलीने आपले मत मांडले. पण आता धोनीचा आयपीएलमधील सहकारी आणि वेस्ट इंडीज संघाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आपले मत व्यक्त केले.

धोनीच्या भविष्याविषयी बोलताना ब्राव्हो म्हणाला, 'मला वाटतं की धोनी पुढील वर्षी होणारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळेल. याबाबत मला कोणतीही शंका नाही. धोनीने क्रिकेटच्या बाहेरील गोष्टीचा कधीच स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवावे, हेच त्याने आम्हाला शिकवले आहे. नक्कीच तो विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य असणार आहे.'

दरम्यान, ब्राव्होने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाशी झालेल्या मतभेदातून निवृत्ती घोषित केली होती. मात्र, त्याने वेस्ट इंडीज बोर्डातील बदलानंतर काही दिवसांपूर्वीच निवृत्तीचा निर्णय माघार घेत क्रिकेटमध्ये कमबॅक केले. ब्राव्हाने वेस्ट इंडीजकडून ४० कसोटी, १६४ एकदिवसीय आणि ६६ टी-२० सामने खेळले आहेत.

हेही वाचा - Aus vs NZ : भिरकवलेली टोपी पंचांनी हवेत झेलली, पाहा स्मिथ आणि दार यांच्यातील मजेशीर सामना

हेही वाचा - अजब कसोटी सामना : दोन्ही संघ प्रत्येकी १० खेळाडूंसह मैदानात

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.