शारजाह - मागील दोन सामन्यांतील पराभव विसरुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफ फेरी गाठण्याची संधी आहे. पण त्यांना यासाठी आज सायंकाळी होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करावा लागणार आहे.
...बंगळुरू नेट रनवर अवलंबून
चेन्नई आणि मुंबई यांच्याविरोधात पराभव पत्कारावा लागल्यानंतरही गुणतालिकेत बंगळुरूचा संघ हैदराबादपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. बंगळुरूला राहिलेल्या दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय अनिर्वाय आहे. त्यांचा हैदराबाद नंतर दिल्लीविरुद्ध सामना राहिला आहे. जर या दोन सामन्यात बंगळुरूचा पराभव झाला तरी, ते १४ गुणांसह नेट रनरेटच्या आधारावर प्ले ऑफ फेरी गाठू शकतात. पण त्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर हे शक्य होईल. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल बंगळुरुसाठी सातत्याने योगदान देत असून विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची साथ त्याला लाभणे गरजेची आहे. गोलंदाजीत नवदीप सैनीच्या दुखापतीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
हैदराबादला दोन्ही सामन्यात विजयाची नितांत गरज -
दुसरीकडे हैदराबादचा संघ १२ सामन्यात १० गुणांसह स्पर्धेत आपले आव्हान राखून आहे. त्यांना राहिलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. हैदराबादचा संघ बंगळुरू आणि मुंबईविरुद्ध सामना खेळणार आहे. जर या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला तरी देखील त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर त्यांचे भवितव्य असेल. डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान साहा यांनी मागील सामन्यात तडाखेबंद कामगिरी केली आहे. त्यांना इतर खेळाडूंची साथ गरजेची आहे. राशिद खान हैदराबादसाठी हुकमी एक्का ठरत आहे. राशिद शिवाय संदीप शर्मा आणि टी. नटराजन यांनी देखील प्रभावी मारा केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), अॅरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वाशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अॅडम झम्पा, इसुरु उडाना, मोइन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
सनरायझर्स हैदराबादचा संघ -
डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टॉ, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, वृद्धीमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.