ETV Bharat / sports

RR VS SRH : राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात 'करा अथवा मरा' लढत - हैदराबाद वि. राजस्थान आजचा सामना

आयपीएल २०२० मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदाराबाद यांच्यात सामना होणार आहे.

DREAM11 IPL 2020, MATCH 40: RR VS SRH PREVIEW
राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात 'करा अथवा मरा' लढत
author img

By

Published : Oct 22, 2020, 3:36 PM IST

दुबई - आयपीएल २०२०मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदाराबाद यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी 'करा अथवा मरा' अशा स्थितीतील असून यात दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक आहे. उभय संघादरम्यान होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघातील अनुभव नसलेले युवा खेळाडू आपली छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असतील.

राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात 'करा अथवा मरा' लढत...

आयपीएल २०२० च्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ नऊ सामन्यांत सहा गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे, तर राजस्थानचा संघ १० सामन्यांत आठ गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे. पाच सामने बाकी असलेल्या हैदराबादला आणखी एकसुद्धा पराभव परवडणारा नाही. राजस्थानची स्थिती त्या तुलनेत थोडीशी बरी आहे.

राजस्थानने मागील सामन्यात चेन्नईला मात दिली होती. यामुळे त्यांचे मनोबल वाढलेले आहे. फलंदाजीत जोस बटलर सातत्याने धावा करत आहे. तसेच चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाबाद २६ धावा करत सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. पण अष्टपैलू बेन स्टोक्स अद्याप मोठी खेळी साकारू शकला नाही. रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पंजाबचा फलंदाज मनन व्होराला संधी मिळू शकते. जोफ्रा आर्चरवर राजस्थानच्या गोलंदाजीची धुरा आहे. त्याला फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल आणि राहुल तेवतिया यांची चांगली साथ मिळत आहे.

दुसरीकडे, हैदराबादला मागील सामन्यात कोलकाताकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्कारावा लागला होता. पण हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टॉ, मनीष पांडे आणि केन विल्यमसन हे चार अव्वल फलंदाज आहेत. ते कधीही सामन्याचे चित्र पालटवू शकतात. असे असले तरी दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिचेल मार्श नसल्याची तीव्र उणीव हैदराबादला भासत आहे. संदीप शर्मा, टी नटराजन आणि बासिल थम्पी यांच्यावर हैदराबादच्या वेगवान गोलंदाजीची धुरा आहे.

  • राजस्थान रॉयल्सचा संघ -
  • जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयांक मार्कंडेय, महिपाल लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेविड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.
  • सनरायझर्स हैदराबादचा संघ -
  • डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टॉ, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फाबियान एलेन, पृथ्वी राज यरा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टेनलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.