ETV Bharat / sports

DC vs KXIP : दिल्लीसमोर मनोबल उंचावलेल्या पंजाबचे आव्हान

author img

By

Published : Oct 20, 2020, 8:43 AM IST

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे.

Dream11 IPL 2020, Match 2: DC vs KXIP Preview
DC vs KXIP : दिल्लीसमोर मनोबल उंचावलेल्या पंजाबचे आव्हान

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. सुरूवातीच्या सात सामन्यांपैकी अवघा एक सामना जिंकणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने मागील दोन सामन्यात अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवले आहे. त्यामुळे त्यांचा मनोबल वाढलेले आहे. पंजाबला स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दुसरीकडे दिल्ली आजचा सामना जिंकून प्ले ऑफचे स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दिल्लीने या हंगामात धमाकेदार कामगिरी केली आहे. ते ९ सामन्यात १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहेत. त्यांचा सलामीवीर शिखर धवन फॉर्मात आहे. पण दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ मागील काही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला आहे. ऋषभ पंतच्या जागेवर संधी मिळालेला अजिंक्य रहाणेला अद्याप आपली छाप सोडता आलेली नाही. पण मधल्या फळीत शिमरोन हेटमायर, मार्कस स्टायनिस चांगली कामगिरी करत आहेत. अक्षर पटेल आणि हर्षल पटेल ही जोडीही धम्माल करत आहे गोलंदाजीत कागिसो रबाडा, एनरिक नार्टजे भेदक मारा करत आहेत. त्यांना रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची साथ लाभत आहे.

दुसरीकडे पंजाबची सलामीवीर जोडी केएल राहुल आणि मयांक अग्रवाल सातत्याने धावा करत आहेत. ख्रिस गेलसह निकोलस पूरनही फॉर्मात आहे. पण ग्लेन मॅक्सवेलला अद्याप सूर गवसलेला नाही. गोलंदाजीत मोहम्मद शमीने पंजाबसाठी हुकमी एक्का ठरत आहे. शिवाय ख्रिस जॉर्डन याने देखील चांगला मारा केला आहे. फिरकीची कमान रवि बिश्र्नोई यशस्वीरित्या सांभाळत आहे.

  • किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ -
  • केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बरार, इशान पोरेल, मनदीप सिंह, जेम्स नीशाम, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हुड्डा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉट्रेल, मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकांडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलोजेन आणि सिमरन सिंह.
  • दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
  • श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबादा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिच्छाने, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, एनरिच नोर्टजे आणि डेनियल सॅम्स.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.