ETV Bharat / sports

४ षटक ४ विकेट आणि शून्य धावा, न्यूझीलंडच्या गोलंदाजाने टाकला भन्नाट स्पेल - न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा भन्नाट स्पेल

न्यूझीलंडच्या संघातून खेळणाऱ्या रोजमेरी मेयर या महिला क्रिकेटपटूने स्थानिक सामन्यात एक धडाकेबाज पराक्रम करून दाखवला आहे. सद्या न्यूझीलंडमध्ये श्रीम्प्टन चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रोजमेरीने डबल हॅटट्रिकची नोंद केली. विशेष म्हणजे आतापर्यंत अशी कामगिरी कुणालाही करता आलेली नाही.

४ षटक ४ विकेट आणि शून्य धावा, न्यूझीलंडच्या गोलंदाजाने टाकला भन्नाट स्पेल
author img

By

Published : Nov 7, 2019, 7:38 PM IST

Updated : Nov 7, 2019, 7:50 PM IST

वेलिंग्टन - क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये अनेकदा विक्रम बनतात आणि मोडतात. पण, यात काही आश्चर्यजनक विक्रमाची नोंद देखील होते. असा एक विक्रम आज (गुरुवार) न्यूझीलंडमध्ये झाला.

न्यूझीलंडच्या संघातून खेळणाऱ्या रोजमेरी मेयर या महिला क्रिकेटपटूने स्थानिक सामन्यात एक धडाकेबाज पराक्रम करून दाखवला आहे. सद्या न्यूझीलंडमध्ये श्रीम्प्टन चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रोजमेरीने डबल हॅटट्रिकची नोंद केली. विशेष म्हणजे आतापर्यंत अशी कामगिरी कुणालाही करता आलेली नाही. स्पर्धेत दोन सामन्यात हॅटट्रिक केल्याने अशी कामगिरी करणारी ती पहिलीच ठरली आहे.

रोजमेरी मेयरने हॉक बे संघाचे प्रतिनिधित्व करताना ४ षटकांमध्ये एकही धाव न देता ४ चेंडूत ४ बळी घेतले. तसेच तिने फलंदाजीत २ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १६ चेंडूत ३३ धावाही केल्या. हॉक बे संघाने प्रतिस्पर्धी संघाला २६४ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना तारानाकी संघाचे सगळे फलंदाज ५६ धावांतच माघारी परतले.

हेही वाचा - क्रिकेटसाठी कायपण..! स्वतःच्या लग्नात पाहिला क्रिकेट सामना, आयसीसीने शेअर केला फोटो

हेही वाचा - भारत विरुध्द बांगलादेश सामना : आज होऊ शकतात 'हे' विक्रम

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Nov 7, 2019, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.