मुंबई - भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या केद्रिय कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी, बीसीसीआयची बिनशर्त माफी मागितली आहे. दरम्यान, कार्तिकने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली होती.
कार्तिकने केलेले कृत्य हे बीसीसीआयच्या नियमानुसार कराराचे उल्लंघन करणारे आहे. यामुळे कार्तिकला बीसीसीआयची माफी मागावी लागली. याविषयी कार्तिकने त्याच्या उत्तरात म्हटले आहे की, तो प्रशिक्षक ब्रॅडन मॅक्युलमच्या विनंतीवरून पोर्ट ऑफ स्पेनला गेला होता. मॅक्युलनच्या सांगण्यावरुनच मी टीकेआरची जर्सी घातली. मला यासाठी बीसीसीआयची परवानगी घ्यायला हवी होती. मात्र, मी ती घेतली नाही, यामुळे मी बीसीसीआयची बिनशर्त माफी मागतो.
नेमकं काय आहे प्रकरण -
दिनेश कार्तिकने कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली होती. या संघाचे मालकी हक्क शाहरुख खानकडे आहेत. यावेळी त्रिनबागो नाइट रायडर्सच्या जर्सीत दिसला होता. यावर बीसीसीआयने कार्तिकला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
या प्रकारानंतर मी इतर कोणत्याही सामन्यात टीकेआरच्या ड्रेसिंग रुममध्ये जाणार नाही. असेही कार्तिने माफीनाम्यात म्हटले आहे. कार्तिकच्या माफीनाम्यानंतर बीसीसीआय हे प्रकरण मिटवू शकते.