लंडन - इग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू दिमित्री मस्करेनासची पुन्हा एकदा मिडलसेक्सच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. २००७ मध्ये भारताविरूद्धच्या झालेल्या ६ व्या एकदिवसीय सामन्यात मस्करेनासने युवराज सिंगच्या एका षटकात पाच षटकार ठोकले होते. हा सामना भारताने दोन गडी राखून जिंकला होता.
हेही वाचा - "सेहवागला पाकिस्ताननं मोठं केलं", रझाकचं नवीन वक्तव्य
'स्टुअर्ट लॉ आणि निक पोथाससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांसोबत काम करणे खूपच रंजक आणि माझ्या विकासासाठी मोठी गोष्ट आहे. मला शेवटचे वर्ष खूप आवडले. आम्ही गोलंदाजीत प्रगती केली आहे', असे मस्करेनासने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
'मागील हंगामाप्रमाणेच संघ आहे. मला वाटते की आम्ही पुन्हा एकदा अंतिम फेरीसाठी खेळू. संघात सामील होण्यास मी उत्साही आहे', असेही मस्करेनास म्हणाला. गेल्या वर्षी स्टुअर्ट लॉने मास्करेनासची नियुक्ती केली होती आणि व्हिएलिटी ब्लास्टच्या बाद फेरीत संघाला नेण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.