दुबई - आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आमने सामने येणार आहेत. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ नवीन जर्सी परिधान करणार आहे.
-
💙💜❤️🧡💛
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Dilliwalon, we are adding more colours to our vibrant game 🎨
Here's to celebrating a beautiful partnership this #IPL season with @JSWPaints, as we endeavour to #EmbraceEveryColour 😇
#JSWPaints #YehHaiNayiDilli pic.twitter.com/jMK4h2e3l1
">💙💜❤️🧡💛
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 5, 2020
Dilliwalon, we are adding more colours to our vibrant game 🎨
Here's to celebrating a beautiful partnership this #IPL season with @JSWPaints, as we endeavour to #EmbraceEveryColour 😇
#JSWPaints #YehHaiNayiDilli pic.twitter.com/jMK4h2e3l1💙💜❤️🧡💛
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 5, 2020
Dilliwalon, we are adding more colours to our vibrant game 🎨
Here's to celebrating a beautiful partnership this #IPL season with @JSWPaints, as we endeavour to #EmbraceEveryColour 😇
#JSWPaints #YehHaiNayiDilli pic.twitter.com/jMK4h2e3l1
दिल्लीचा संघ जेएसडब्ल्यू पेंट्स ब्रँडची जर्सी घालणार आहे. जेएसडब्ल्यू पेंट्स दिल्लीच्या संघाची एक भागिदार कंपनी आहे. ''मागील काही वर्षांत जेएसडब्ल्यूने भारतीय खेळ पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आमचा संघ बंगळुरूबरोबरच्या सामन्यात जेएसडब्ल्यू पेंट्सची जर्सी अभिमानाने परिधान करेल. एकतेचा संदेश देण्यासाठी असे करण्यात येईल'', असे दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ धीरज मल्होत्रा यांनी सांगितले.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांनी आत्तापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. सध्या ते गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहेत. तर, बंगळरूचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघातील हा पाचवा सामना असून दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यास प्रयत्नशील असतील.