आबुधाबी - आयपीएल २०२०मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा १५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने जॉनी बेअरस्टो (५३), डेव्हिड वॉर्नर (४५) आणि केन विल्यमसन (४१) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचा संघ निर्धारीत २० षटकांत ७ बाद १४७ धावा करू शकला. दिल्लीचा कर्णधार श्रेयश अय्यरला या सामन्यात पराभव पत्करावा लागलाच, शिवाय १२ लाखांचा दंडही भरावा लागला.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला षटकांचा वेग संथ ठेवल्यामुळे १२ लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे. आयपीएल २०२०मधील ११व्या सामन्यातील पहिला डाव हा निर्धारित वेळेपेक्षा उशिरा संपला. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी हा दंड सुनावला.
याआधी रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला देखील षटकाचा वेग संथ ठेवल्याने १२ लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ ठेवली होती. महत्त्वाचे म्हणजे, हा सामना आरसीबीने गमावला.
दिल्लीचा संघ दोन विजय आणि एका पराभवासह गुणातालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा पुढील सामना ३ ऑक्टोबरला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा - वडिलांना गमावलं आणि 3 महिन्यांनी आईही गेली, सामन्यानंतर राशिद खान भावूक
हेही वाचा - IPL 2020 : सुसाट राजस्थानची विजयी घोडदौड रोखण्याचे कोलकातापुढे आव्हान