नागपूर - आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या भारतीय हॅट्ट्रिकवीराचा मान नोंदवत दीपक चाहरने भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. नागपूर येथे रंगलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात भारताने बांगलादेशला ३० धावांनी हरवले आणि मालिका २-१ ने खिशात घातली. या कामगिरीमुळे दीपक चाहरला मालिकावीर आणि सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
-
India win and claim the series 2-1!
— ICC (@ICC) November 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Deepak Chahar took his maiden T20I five-wicket haul and took a hat-trick after half-centuries from KL Rahul and Shreyas Iyer 👏 #INDvBAN pic.twitter.com/ieIXq1V497
">India win and claim the series 2-1!
— ICC (@ICC) November 10, 2019
Deepak Chahar took his maiden T20I five-wicket haul and took a hat-trick after half-centuries from KL Rahul and Shreyas Iyer 👏 #INDvBAN pic.twitter.com/ieIXq1V497India win and claim the series 2-1!
— ICC (@ICC) November 10, 2019
Deepak Chahar took his maiden T20I five-wicket haul and took a hat-trick after half-centuries from KL Rahul and Shreyas Iyer 👏 #INDvBAN pic.twitter.com/ieIXq1V497
हेही वाचा - चीन ओपन : जपानचा केंटो मोमोटा विजेता
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात हॅट्ट्रिक मिळवणारा दीपक चाहर पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सोबतच त्याने टी-२० क्रिकेट प्रकारात गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम फिगर नोंदवली. चाहरने या सामन्यात केवळ ७ धावा देत ६ गडी बाद केले. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर होता. २०१२ मध्ये त्याने केवळ ८ धावा देत ६ गडी बाद करण्याची किमया केली होती.
-
The best bowling figures in T20I cricket!
— ICC (@ICC) November 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Take a bow Deepak Chahar 🔥 pic.twitter.com/3OGnB99h0n
">The best bowling figures in T20I cricket!
— ICC (@ICC) November 10, 2019
Take a bow Deepak Chahar 🔥 pic.twitter.com/3OGnB99h0nThe best bowling figures in T20I cricket!
— ICC (@ICC) November 10, 2019
Take a bow Deepak Chahar 🔥 pic.twitter.com/3OGnB99h0n
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या १७४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४४ धावांवर आटोपला. भारताकडून दीपक चाहरने सर्वाधिक ६, शिवम दुबेने ३ तर चहलने १ बळी घेतला.