ETV Bharat / sports

IND VS BAN : टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहरचा 'विश्वविक्रम'

बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात दीपक चहरने ३.२ षटके गोलंदाजी करताना केवळ ७ धावा देत या ६ विकेट घेतल्या. तो भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या विक्रमाबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचाही विक्रम रचला आहे.

author img

By

Published : Nov 11, 2019, 8:19 AM IST

नागपूर - भारत विरुद्ध बांगलादेश संघात जामठा मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. निर्णायक सामन्याचा हिरो ठरला दीपक चहर.

बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात दीपक चहरने ३.२ षटके गोलंदाजी करताना केवळ ७ धावा देत या ६ विकेट घेतल्या. तो भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या विक्रमाबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचाही विक्रम रचला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजीत सर्वोत्तम प्रदर्शन -

  • दीपक चाहर - ६ विकेट - ७ धावा - (विरुद्ध बांगलादेश, नागपूर, २०१९)
  • अजंता मेंडिस - ६ विकेट - ८ धावा (विरुद्ध झिम्बाब्वे, हॅम्बॅन्टोटा, २०१२)
  • अजंता मेंडिस - ६ विकेट - १६ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पाल्लेकेले, २०११)
  • युजवेंद्र चहल - ६ विकेट - २५ धावा (विरुद्ध इंग्लंड, बंगळूरु, २०१७)

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात पहिली हॅट्ट्रिक हरभजन सिंगने घेतली होती. २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळताना हरभजनने हॅट्ट्रिक साधली होती. तर एकदिवसीय सामन्यात भारतासाठी पहिली हॅट्ट्रिक चेतन शर्मा यांनी घेतली होती. आता टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहरने पहिली हॅट्ट्रिक घेतली आहे.

हेही वाचा - टीम इंडियाचा मालिकाविजय, तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशवर ३० धावांनी मात

हेही वाचा - १५ वर्षाच्या शेफालीने सचिनच्या खास विक्रमाला टाकले मागे

Intro:Body:

Dummy

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.