ETV Bharat / sports

माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना मेलबर्नवर क्रिकेट मैदानावर अंतिम निरोप - farewell for dean jones

कोरोनामुळे या सोहळ्याला फारसे लोक उपस्थित नव्हते. जोन्सची पत्नी जेन, मुलगी इसाबेला आणि फोबे आणि जोन्स यांच्या बहिणींसह केवळ १० लोक उपस्थित होते. जोन्स यांना ऑस्ट्रेलियाच्या ध्वज असलेल्या ताबूत ठेवण्यात आले होते. त्यावर जोन्स यांच्या कसोटी टोपीचा क्रमांक होता.

Dean jones given farewell by family members at the melbourne cricket ground
माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना मेलबर्नवर क्रिकेट मैदानावर अंतिम निरोप
author img

By

Published : Oct 7, 2020, 3:11 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) अंतिम निरोप देण्यात आला. आयपीएल १३मध्ये स्टार स्पोर्ट्सच्या समालोचनाच्या गटाचा भाग असलेले जोन्स यांचे २४ सप्टेंबर रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • One last lap of the @MCG for Deano, farewelled by ten of his closest family members over the weekend. Forever in our hearts! ❤️ pic.twitter.com/R2skRt2CkB

    — Cricket Australia (@CricketAus) October 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनामुळे या सोहळ्याला फारसे लोक उपस्थित नव्हते. जोन्सची पत्नी जेन, मुलगी इसाबेला आणि फोबे आणि जोन्स यांच्या बहिणींसह केवळ १० लोक उपस्थित होते. जोन्स यांना ऑस्ट्रेलियाच्या ध्वज असलेल्या ताबूत ठेवण्यात आले होते. त्यावर जोन्स यांच्या कसोटी टोपीचा क्रमांक होता. जेन म्हणाल्या, "गेल्या आठवड्यापासून डीनला मिळालेल्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि त्यांनी आमच्याशी ज्या आठवणी शेअर केल्या त्याबद्दल आभार."

  • A hearse carrying Jones' handmade Indian coffin was adorned with the Australian flag and a floral 324 arrangement showcasing Deano's Australian Test cap number ❤️ pic.twitter.com/MaZGaERs6Y

डीन जोन्स यांचा जन्म मेलबर्न येथे झाला होता. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी ४६.५५च्या सरासरीने ३ हजार ६३१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये २१६ ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. जोन्स यांनी १६४ एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्यांनी ४४.६१च्या सरासरीने ७ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ६ हजार ६८ धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.