ETV Bharat / sports

KKR VS DC : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात केकेआर 'या' स्फोटक फलंदाजाला मैदानात उतरवण्याची शक्यता - Tom Banton Replace Narine

आजच्या दिल्लीविरूद्धच्या सामन्यात सुनिल नरेनच्या जागेवर स्फोटक फलंदाज टॉम बँटनचा समावेश केकेआर करू शकते.

DC vs KKR, IPL 2020: Will Tom Banton Replace Sunil Narine in Kolkatas Playing 11 at Sharjah?
KKR VS DC : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात केकेआर 'या' स्फोटक फलंदाजाला मैदानात उतरवण्याची शक्यता
author img

By

Published : Oct 3, 2020, 3:46 PM IST

शारजाह - आयपीएल २०२० मध्ये आज १६ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर होणार आहे. कोलकाता या सामन्यात आपल्या सलामीवीर जोडीमध्ये बदल करण्याची दाट शक्यता आहे.

शुबमन गिल आणि सुनिल नरेन या दोघांनी मागील तीन सामन्यात कोलकाताच्या डावाची सुरूवात केली. पण, तीनही सामन्यात सुनिल नरेन धावा करण्यात अपयशी ठरला. यामुळे आजच्या दिल्ली विरूद्धच्या सामन्यात नरेनच्या जागेवर स्फोटक फलंदाज टॉम बँटनचा समावेश केकेआर करू शकते.

केकेआरच्या मधल्या फळीची भिस्त नितीश राणा, कर्णधार दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन आणि स्फोटक आंद्रे रसेल यांच्यावर असेल. गोलंदाजीत केकेआर शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि पॅट कमिन्स चांगली कामगिरी करत आहेत. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती फिरकी मारा व्यवस्थित सांभाळत आहे. यामुळे नरेनच्या जागेवर बँटनला स्थान मिळू शकते.

असा असू शकतो केकेआरचा संभाव्य संघ -

टॉम बँटन, शुबमन गिल, नितीश राणा, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार, यष्टीरक्षक), इयॉन मॉर्गन, पँट कमिंन्स, कमलेश नागरकोटी, शिमव मावी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

हेही वाचा - IPL २०२० : आज पुन्हा शाहजाहच्या मैदानावर धावांचा पाऊस?, केकेआर-दिल्ली यांच्यात लढत

हेही वाचा - RCB vs RR : राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.