ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरनं केलं 'मुंडण'...जाणून घ्या कारण - डेव्हिड वॉर्नर केले मुंडण न्यूज

कोरोनाविरोधात संपूर्ण जग युद्ध लढत आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत या लोकांच्या समर्थनार्थ मी माझे मुंडण करण्याचे ठरवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मी मुंडण केले होते, असे वॉर्नरने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले.

david warner shave off head in support towards medical staff fighting against corona
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरनं केलं 'मुंडण'...जाणून घ्या कारण
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:23 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कोरोना व्हायरस विरुद्ध लढणार्‍या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आपले मुंडण केले आहे. वॉरर्नरने मुंडण करतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

कोरोनाविरोधात संपूर्ण जग युद्ध लढत आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत या लोकांच्या समर्थनार्थ मी माझे मुंडण करण्याचे ठरवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मी मुंडण केले होते, असे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले.

ही पोस्ट शेअर करताना वॉर्नरने मुंडण करण्याचे चॅलेंज भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सहकारी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला ११ मार्च रोजी जागतिक साथीचा रोग जाहीर केला होता.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये १९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.