मुंबई - ऑस्ट्रेलियाचा टिकटॉक स्टार क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही हसू आवरले नाही. त्याने वॉर्नरच्या व्हिडिओवर कमेंट करताना हसणाऱ्या ईमोजींचा वापर केला आहे.
कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे घरी असलेला डेव्हिड वॉर्नर तेलुगू, तमिळ, पंजाबी आणि हिंदी गाण्यावर व्हिडिओ बनवत आहे. त्याचे हे व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय ठरत आहेत. वॉर्नरला या कामी त्याची पत्नी कँडीस आणि मुलं मदत करतात. आता वॉर्नरचा बाला डान्सचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.
- View this post on Instagram
I think I’ve got you covered @akshaykumar #bala #fun #friday #challenge 😂😂😂 Friday nights 👌👌
">
वॉर्नरने बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या प्रसिद्ध गाण्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. त्याने कोट घालून अक्षयच्या 'हाऊसफूल-४' सिनेमातील 'बाला' या गाण्यावर डान्स केला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
वॉर्नरचा बाला डान्स पाहून विराट कोहलीला हसू आवरले नाही. त्याने या व्हिडिओवर हसणाऱ्या ईमोजींचा वापर करत कमेंट केली आहे. महत्वाचे म्हणजे वॉर्नरच्या या व्हिडिओवर अनेक क्रिकेटपटूंनी कमेंट केली आहे. काही खेळाडूंनी तर वॉर्नरने अधिकृतरित्या भान हरवले असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी त्याला बॉलिवूडमध्ये येण्याचाही सल्ला दिला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना वॉर्नरने विराटला ड्यूएट करण्याचे चॅलेंजदेखील दिले आहे. तसेच त्याने विराटला सल्ला दिला की, अनुष्का शर्मा त्याच्यासाठी टिक-टॉक अकाऊंट तयार करू शकते. दरम्यान, याआधी वॉर्नरच्या सल्ल्यावरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने देखील टिक-टॉक जाईन केले आहे.
हेही वाचा - कोरोनानंतर 'या' महिन्यात रंगणार हैदराबाद ओपन
हेही वाचा - रोहितचे नेतृत्त्व महेंद्रसिंह धोनीसारखे - सुरेश रैना