दुबई - इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ५००० धावा पूर्ण करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान वॉर्नरने ही कामगिरी नोंदवली. वॉर्नर लीगमध्ये ५०००हून अधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलमधील या विक्रमात विराट कोहली या यादीत ५७५९ धावांसह अव्वल स्थानी आहे. तर, सुरेश रैना ५३६८ धावाांसह दुसर्या क्रमांकावर असून रोहित शर्मा ५१४९ धावाांसह तिसर्या क्रमांकावर आहे. डावाच्या जोरावर वॉर्नर अशी कामगिरी करणारा वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याने १३५व्या डावात ५००० धावा पूर्ण केल्या आहेत.
-
Fastest to Mt. 5k ✅
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1st overseas player to do so ✅
Only the 4th player to cross 5k runs ✅#SRHvKKR #OrangeArmy #KeepRising https://t.co/0orKnrQvOC
">Fastest to Mt. 5k ✅
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 18, 2020
1st overseas player to do so ✅
Only the 4th player to cross 5k runs ✅#SRHvKKR #OrangeArmy #KeepRising https://t.co/0orKnrQvOCFastest to Mt. 5k ✅
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 18, 2020
1st overseas player to do so ✅
Only the 4th player to cross 5k runs ✅#SRHvKKR #OrangeArmy #KeepRising https://t.co/0orKnrQvOC
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. कोलकाताने २० षटकांत १६३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनेही समान १६३ धावा करत सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये, आयपीएल २०२०चा पहिलाच सामना खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसननेही दोन विकेट घेत केकेआरच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने सुपर ओव्हरमध्ये भेदक गोलंदाजी करत केवळ २ धावा देत २ बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला. तर इयॉन मॉर्गन-दिनेश कार्तिक जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. फर्ग्युसनने मूळ सामन्यात १५ धावांत ३ विकेट घेतल्या.