मुंबई - सुरेश रैना, हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीत आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी आतापर्यंत फारशी चांगली राहिलेली नाही. चेन्नई ६ सामन्यात २ विजय मिळवले आहेत. तर ४ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य नसल्याने चेन्नईचा संघ सध्या संकाटात सापडला आहे. अशात चेन्नईच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मिड सिझन ट्रान्सफर या सुविधेतून नवीन खेळाडूंना संघात देण्याची मागणी केली आहे. अशात चेन्नईची या सुविधेच्या माध्यमातून 'या' तीन खेळाडूंचा विचार करू शकतो. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
अजिंक्य रहाणे -
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने अजिंक्य रहाणेला आपल्या संघात घेतले आहे. पण तेराव्या हंगामात आतापर्यंत अजिंक्य एकही सामना खेळलेला नाही. दिल्लीच्या संघ सद्या सुसाट फार्मात आहे. यामुळे अजिंक्यला अद्याप अंतिम संघात स्थान मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. अजिंक्यकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. त्याने आयपीएलच्या १४० सामन्यात ३ हजार ८२० धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. यामुळे चेन्नई अजिंक्यला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करू शकते.
पार्थिव पटेल -
यष्टीरक्षक पार्थिव पटेल रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात आहे. पण देवदत्त पडीक्कल फार्मात असल्याने पार्थिवला अद्याप एकही सामना खेळावयास मिळालेला नाही. पार्थिवने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चेन्नई एक डावखुरा सलामीवीर हवा, यासाठी पार्थिवचा विचार करू शकते.
विराट सिंह -
सनरायजर्स हैदराबाद संघात असलेल्या विराट सिंहने स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळताना चांगली कामगिरी नोंदवली आहे. विजय हजारे करंडकात त्याने ७ सामन्यात खेळताना ३३५ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ३४२ धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नई व्यवस्थापन विराट सिंहच्या नावाचाही विचार करू शकते.
हेही वाचा - 'धोनीच्या नेतृत्वात चेन्नईला असा संघर्ष करताना कधीच पहिलं नाही'
हेही वाचा - IPL २०२० : ...म्हणून कुलदीप यादव बसला होता संघाबाहेर