कोलकाता - काही दिवसांपूर्वी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या कुटुंबात एका नव्या पाहुणीचे आगमन झाले. वामिका असे विरुष्काच्या मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे. आता आयपीएलमध्ये खेळणारा अजून एक क्रिकटपटू 'बाबा' झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुनील नरिन आणि त्याची पत्नी जेलिया यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.
हेही वाचा - विरुष्काच्या मुलीचे नाव आले समोर, अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट
सुनील नरिनने आपल्या मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ''तू आमच्या हृदयात एक स्थान निर्माण केले आहे. हे स्थान असल्याचे आम्हालाही ठाऊक नव्हते. आम्ही देवाचा सर्व चांगुलपणा आणि सौंदर्य एका छोट्या चेहऱ्यावर पाहिले आहे. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो - बाबा आणि आई'', असे नरिनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
![cricketer Sunil Narine baby boy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10299381_742_10299381_1611054676491_0102newsroom_1612165207_667.png)
नरिनचा संघ केकेआरनेही ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना कळवली आहे.