अबुधाबी - गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यंदाच्या आयपीएलच्या आयोजनामुळे फार आनंदी आहे. हार्दिकने आगामी काळ क्रिकेटसाठी चांगला असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. येत्या शनिवारपासून आयपीएलच्या तेराव्या सत्राला यूएईत सुरुवात होणार असून लीगचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे.
चार वेळा आयपीएल विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत हार्दिक म्हणाला, "मला आयपीएल खेळण्यात मजा येते. मला जोरदार पुनरागमन करायचे आहे. त्यासाठी मी खूप तयारी केली आहे. मला आशा आहे, की येणारा काळ चांगला असेल."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
गेल्या वर्षी हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तो बर्याच काळापासून क्रिकेटपासून दूर होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून पुनरागमनासाठी पूर्णपणे तयार आहे. हार्दिक म्हणाला, "मला ठाऊक आहे, की आयुष्यात दुखापती होतच राहतील. कोणालाही दुखापतग्रस्त व्हायचे नसते. पण हा जीवनाचा भाग आहे. यामुळे मला अधिक कष्ट करण्याची प्रेरणा मिळते. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगल्या लयीत आहे. मला माझा नैसर्गिक खेळ खेळता येईल, अशी आशा आहे."