ETV Bharat / sports

भुवनेश्वर कुमारच्या वडिलांना कर्करोग, एम्समध्ये दाखल

author img

By

Published : Oct 13, 2020, 4:42 PM IST

क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार याचे कुटुंब मेरठच्या गंगानगरमध्ये राहते. त्याचे वडील किरणपाल सिंह यांना काही दिवसांपूर्वीच पोटदुखी जाणवत होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीतही तपासणी केली. चाचणीमध्ये कर्करोगाची पुष्टी झाली.

cricketer bhuvneshwar kumar father kiranpal singh suffering from cancer
भुवनेश्वर कुमारच्या वडिलांना कर्करोग, एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातून बाहेर पडलेल्या भुवनेश्वर कुमारबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंग यांना कर्करोग झाला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते कर्करोग अद्याप पहिल्या टप्प्यात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार याचे कुटुंब मेरठच्या गंगानगरमध्ये राहते. त्याचे वडील किरणपाल सिंह यांना काही दिवसांपूर्वीच पोटदुखी जाणवत होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीतही तपासणी केली. चाचणीमध्ये कर्करोगाची पुष्टी झाली. डॉक्टरांनी माझ्यावर केमोथेरपी केली आहे. या क्षणी मला परदेशात जाण्याची गरज नाही. देशात चांगल्या वैद्यकीय संस्था आहेत आणि माझ्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत, असे किरणपाल सिंह म्हणाले आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना भुवनेश्वर जखमी झाला होता. चेन्नई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात डावाच्या शेवटच्या षटकात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. त्याने या हंगामात खेळलेल्या एकूण ४ सामन्यात ३ गडी बाद केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.