हैदराबाद - भारतीय संघाने आजघडीपर्यंत एकदिवसीय सामन्यामध्ये ११० वेळा ३०० पार धावा केल्या आहेत. यामध्ये भारतीय संघ ५ वेळा ४०० पारही पोहोचला आहे. तर भारतीय संघाने उभारलेली सर्वोच्च धावसंख्या ४१८ इतकी आहे. दरम्यान, क्रिकेट जगतमध्ये सर्वाधिक वेळा ३०० पार धावा करण्याचा मान भारतीय संघाचा आहे. वाचा..भारतीय संघाने कोणत्या संघाविरुध्द ४०० पार धावा केल्या आहेत.
भारत विरुध्द वेस्ट इंडीज - (४१८/५)
भारतीय संघाने २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुध्द इंदोरमध्ये झालेल्या सामन्यात ५ गडी बाद ४१८ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागने ठोकलेल्या द्विशतकाच्या जोरावर ४१८ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना विडींज ४९.२ षटकात सर्वबाद २६५ धावा केल्या. भारताने हा सामना १५३ धावांनी जिंकला.
![cricket record : indian team 5 highest score in odi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4379422_sghehwagh.jpg)
भारत विरुध्द श्रीलंका - (४१४/७)
१५ डिसेंबर २००९ ला गुजरातच्या राजकोटमध्ये भारत विरुध्द श्रीलंका या संघामध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली पण लंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सचिन तेंडूलकरने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर भारताने ४१४ धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. मात्र, या सामन्यात लंकेने कडवी झुंज दिली. पण लंकेचा संघ ४११ धावाच करू शकला आणि भारताने हा सामना ३ धावांनी जिंकला.
![cricket record : indian team 5 highest score in odi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3458141-566-3458141-1559552707860_0608newsroom_1565099743_384.jpg)
भारत विरुध्द बरमूडा - (४१३/५)
२००७ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्यांदाच ४०० पार धावा केल्या. भारताने या सामन्यात ४१३ धावा केल्या. या सामन्यात विरेंद्र सेहवागने शतक ठोकले होते. दरम्यान, भारताने हा सामना तब्बल २५७ धावांनी जिंकला.
![cricket record : indian team 5 highest score in odi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4379422_viru.jpg)
भारत विरुध्द श्रीलंका - (४०४/५)
१३ नोव्हेंबर २०१४ ला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर लंकेविरुध्द झालेल्या सामन्यात भारताने ४०४ धावा केल्या. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने २६४ धावांची खेळी करत विश्वविक्रम रचला. भारताने हा सामना १५३ धावांनी जिंकला.
![cricket record : indian team 5 highest score in odi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4379422_rohit.jpg)
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका - (४०१/३)
२४ फेब्रुवारी २०१० मध्ये ग्वालियरमध्ये आफ्रिका विरुध्दच्या सामन्यात भारताने ४०१ धावा केल्या. हा सामना अविस्मरणीय ठरला तो सचिन तेंडूलकरमुळे. सचिनने या सामन्यात द्विशतक ठोकले. दरम्यान, हा सामना भारताने १५३ धावांनी जिंकला.
![cricket record : indian team 5 highest score in odi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4379422_sachin.jpg)