लंडन - प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंह याचे ‘लॉलीपॉप लागेलु’ हे गाणे केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही प्रचंड लोकप्रिय ठरत असताना दिसत आहे. सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
-
Ultralegend DJ players In London: pic.twitter.com/uIyvahxXHh
— Dr. Batra (@hemantbatra0) June 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ultralegend DJ players In London: pic.twitter.com/uIyvahxXHh
— Dr. Batra (@hemantbatra0) June 12, 2019Ultralegend DJ players In London: pic.twitter.com/uIyvahxXHh
— Dr. Batra (@hemantbatra0) June 12, 2019
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत लंडनच्या रस्त्यावर ‘लॉलीपॉप लागेलु’ या गाण्यावर हजारो क्रिकेट चाहते नाचताना दिसत आहेत, असे लिहिले गेले आहे. मात्र हा व्हिडिओ नक्की इंग्लंडमधला आहे की, इतर कुठला आहे, हे स्पष्ट झालेले नाहीय.
आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला ३० मेला सुरुवात झाली असून अंतिम सामना १४ जुलैला लंडनच्या ऐतिहासीक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.