ETV Bharat / sports

“एक आयपीएल किंवा विश्वकरंडक स्पर्धा झाली नाही, तर काय फरक पडेल?” - harbhajan singh on ipl and t20 wc news

हरभजन म्हणाला, “सध्या माझ्या मनात क्रिकेट ही शेवटची गोष्ट आहे. मी त्याबद्दलही विचार करत नाही. निधी उभारण्याचे आणखीही अनेक मार्ग आहेत. सामना खेळवला जाणे आवश्यक नाही. यावेळी कोणीही क्रिकेट किंवा क्रीडा प्रकाराबद्दल विचार करीत आहे असे मला वाटत नाही. या बर्‍याच लहान गोष्टी आहेत. सध्या जीव महत्वाचा आहे.”

cricket can wait but our lives are at stake says harbhajan
“एक आयपीएल किंवा विश्वकरंडक स्पर्धा झाली नाही तर काय फरक पडेल?”
author img

By

Published : Apr 18, 2020, 8:49 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे क्रिकेट खूप दूर गेले असल्याचे मत भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने दिले आहे. या व्हायरसमुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला. कोरोनाविरूद्धच्या लढाईत निधी गोळा करण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवली गेली पाहिजे, असे मत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नुकतेच मांडले होते. अख्तरच्या या वक्तव्यावर भज्जीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हरभजन म्हणाला, “सध्या माझ्या मनात क्रिकेट ही शेवटची गोष्ट आहे. मी त्याबद्दलही विचार करत नाही. निधी उभारण्याचे आणखीही अनेक मार्ग आहेत. सामना खेळवला जाणे आवश्यक नाही. यावेळी कोणीही क्रिकेट किंवा क्रीडा प्रकाराबद्दल विचार करीत आहे असे मला वाटत नाही. या बर्‍याच लहान गोष्टी आहेत. सध्या जीव महत्वाचा आहे.”

“हो, क्रिकेटने आपल्याला बरेच काही दिले आहे. आज मी जो काही आहे तो क्रिकेटमुळे आहे. परंतु क्रिकेटविषयी बोलण्याची ही वेळ नाही. आपण लोकांना कशी मदत करू शकतो, याबद्दल मला बोलण्यास आवडेल”, असेही भज्जी म्हणाला. या व्हायरसमुळे यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणार्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी हरभजन म्हणाला, “एक आयपीएल आणि एक विश्वकरंडक स्पर्धा जर यावर्षी झाली नाही तर काय फरक पडेल? पण जर गोष्टी अशाच चालू राहिल्या तर आपले आयुष्य संपेल. आपण सर्व काही गोष्टी हलक्या पद्धतीत घेत आहोत. परंतु या आजाराने आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल आभार मानायला शिकवले आहे. जर तुम्हीच निरोगी नसाल तर तुम्ही तुमचे पैसे, गाडी, घर काय करणार आहे?”

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.