सिडनी - क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) नव्या हंगामी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) नेमणूक करणार आहे. सध्याचे सीईओ केव्हिन रॉबर्ट्स यांच्याशी सीए फारकत घेणार असल्याचे वृत्त आहे.
एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने रॉबर्ट्स यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रॉबर्ट्स यांना पदावरून काढण्याची घोषणा केली जाईल. त्यानंतर हंगामी सीईओ निवडला जाईल.
एप्रिलमध्ये कोरोनादरम्यान 80 टक्के कर्मचार्यांना काढून टाकल्याबद्दल रॉबर्ट्स यांच्यावर मोठी टीका झाली होती. "रॉबर्ट्स यांच्या निर्णयामुळे खेळाडू आणि कर्मचार्यांचे मनोबल कमी झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून रॉबर्ट्स ज्या प्रकारे गोष्टी हाताळत होते त्याबद्दल संचालक चिंतेत होते."
जेम्स सदरलँडननंतर रॉबर्ट्स यांनी सीईओचा पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते सीएमध्ये मुख्य संचालन अधिकारी होते. त्यांचा करार पुढच्या वर्षापर्यंत होता.