ETV Bharat / sports

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला मोठा निर्णय - Cricket australia latest decision

केव्हिन रॉबर्ट्सच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये हंगामी मुख्य कार्यकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या निक हॉकले यांनी नवीन योजना आणली आहे. यामुळे खेळात 'दीर्घकालीन स्थिरता आणि विकास' सुनिश्चित होईल असा त्यांचा विश्वास आहे.

Cricket australia announces job cuts amid coronavirus pandemic
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ऑस्ट्रेलियाने घेतला मोठा निर्णय
author img

By

Published : Jun 17, 2020, 5:11 PM IST

Updated : Jun 17, 2020, 5:33 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटापासून मुक्त होण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ व्यवस्थापन बोनस, इतर 40 कर्मचार्‍यांना बरखास्त करणे आणि 'अ' संघांच्या आंतरराष्ट्रीय दौर्‍यांना स्थगित करणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

केव्हिन रॉबर्ट्सच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये हंगामी मुख्य कार्यकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या निक हॉकले यांनी नवीन योजना आणली आहे. यामुळे खेळात 'दीर्घकालीन स्थिरता आणि विकास' सुनिश्चित होईल असा त्यांचा विश्वास आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, "कर्मचार्‍यांना सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2021च्या सुधारित योजनेत कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांचे अंशत: निराकरण करण्यासाठी वर्षात सुमारे 4 कोटी डॉलर्सची कपात करण्यात येणार आहे. यात खेदाची बाब म्हणजे 40 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे. क्रिकेटसाठी हे वाईट दिवस आहेत.''

2021च्या आर्थिक वर्षासाठी ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचे दौर, क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन इव्हेंट्स, नॅशनल प्रीमियर क्रिकेट टी-20 आणि टोयोटाच्या सेकंड इलेव्हन स्पर्धांवर बंदी घालण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे.

Last Updated : Jun 17, 2020, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.