कोलंबो - कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या देशातील सर्व स्थानिक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटभया राजपक्षे यांनी २३ मार्चपर्यंत कर्फ्यू जाहीर केला. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विट करत सांगितलं की, 'देशातील सद्य परिस्थिती पाहता, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सर्व स्थानिक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.'
-
Taking into consideration the prevailing health (COVID-19 Pandemic) situation in the country, the Tournament Committee of the SLC decided to postpone the conducting of all Domestic Tournaments, until further notice. #SLCDomestic
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Taking into consideration the prevailing health (COVID-19 Pandemic) situation in the country, the Tournament Committee of the SLC decided to postpone the conducting of all Domestic Tournaments, until further notice. #SLCDomestic
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 20, 2020Taking into consideration the prevailing health (COVID-19 Pandemic) situation in the country, the Tournament Committee of the SLC decided to postpone the conducting of all Domestic Tournaments, until further notice. #SLCDomestic
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 20, 2020
दरम्यान, याआधी १२ मार्चपासून इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्याची कसोटी मालिका आधीच रद्द करण्यात आली आहे. तर श्रीलंकेत २३ मार्चपर्यंत कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
चीनच्या वुहान शहरातून जगभरात प्रसार झालेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २ लाखांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. तर जगभरातील १५० पेक्षा जास्त देशात या विषाणूचा फैलाव झाला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे.
हेही वाचा - अनुष्का-विराटचा 'तो' फोटो होतोय व्हायरल, सानियानेही केलं कमेंट
हेही वाचा - Video : श्रेयस अय्यर नव्हे जादूगार, बहीण नताशासह दाखवला जादू प्रयोग