लंडन - इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट क्लब केंटने कोरोनाच्या उद्रेकामुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीशी केलेला करार रद्द केला. २०२० चॅम्पियनशिपच्या पहिल्या सात सामन्यांमध्ये हेन्री यापुढे क्लबकडून खेळणार नाही. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंग्लंडमध्ये सर्व प्रकारचे क्रिकेट इव्हेंट २८ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. यामुळे क्लबला हा निर्णय घ्यावा लागला आहे. २०१८ मध्ये क्लबसाठी हेन्रीने ११ सामन्यांत ७५ बळी घेतले.
केंटचे क्रिकेट डायरेक्टर पॉल डॉंटन म्हणाले, की ईसीबीने सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हेन्री या हंगामात क्लबमध्ये परतणार नाही. या कठीण परिस्थितीत आपल्याद्वारे घेतलेला निर्णय त्याने समजून घेतल्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. मला आशा आहे की भविष्यात आम्ही पुन्हा मॅटबरोबर पुन्हा काम करू.