नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिल्ली सरकारकडे मदतीचा हात दिला आहे. युवराजने दिल्ली सरकारला १५ हजार एन-९५ मास्क दिले आहेत. कठीण काळातील या सहकार्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी युवराजचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर कर्करोगावर युवराजचा विजय हा आजच्या युगातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
युवराज आणि त्यांच्या संस्थेने दिल्ली सरकारला हे मास्क उपलब्ध केले आहेत. हे मास्क विविध रुग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार करणार्या डॉक्टर आणि नर्सेस यांना देण्यात येणार आहेत. दिल्ली सरकारने यापूर्वी वैद्यकीय कर्मचार्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी पीपीई किट नसल्याचे सांगितले होते. वैद्यकीय कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट देण्याची मागणी दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे केली होती.
दिल्ली सरकारला पाठिंबा देत युवराजने ट्विटमध्ये म्हटले आहे, की कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईत आरोग्य सेवा देणारे आपले खरे नायक आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना हा पाठिंबा दिल्याचा मला अभिमान आहे.
-
Healthcare professionals are the true #heroes in the fight against #Covid_19!
— yuvraj singh (@YUVSTRONG12) April 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Team @YOUWECAN, @ihsmarkit & I are honoured to support @ArvindKejriwal & @msisodia by sending 15,000 #N95masks for #HealthcareHeroes in Delhi
Thank you @IHSMarkit @himanshus_tweet for this initiative pic.twitter.com/qgihjgv1PD
">Healthcare professionals are the true #heroes in the fight against #Covid_19!
— yuvraj singh (@YUVSTRONG12) April 18, 2020
Team @YOUWECAN, @ihsmarkit & I are honoured to support @ArvindKejriwal & @msisodia by sending 15,000 #N95masks for #HealthcareHeroes in Delhi
Thank you @IHSMarkit @himanshus_tweet for this initiative pic.twitter.com/qgihjgv1PDHealthcare professionals are the true #heroes in the fight against #Covid_19!
— yuvraj singh (@YUVSTRONG12) April 18, 2020
Team @YOUWECAN, @ihsmarkit & I are honoured to support @ArvindKejriwal & @msisodia by sending 15,000 #N95masks for #HealthcareHeroes in Delhi
Thank you @IHSMarkit @himanshus_tweet for this initiative pic.twitter.com/qgihjgv1PD
युवराजच्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याचे आभार मानले. युवराज दिल्ली तुमच्या उदार समर्थनाबद्दल कृतज्ञ आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे. विशेष म्हणजे दिल्लीत आतापर्यंत कोरोनाची एकूण १७०७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील २६ वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.