मुंबई - बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन १४ दिवसांच्या आयसोलेशननंतर, अमेरिकेतील त्याच्या घरी परतला आहे. शाकिबने ढाकाहून अमेरिका असा प्रवास केला होता. यामुळे त्याला आयसोलेशनसाठी, एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पत्नी आणि मुलीचा फोटो शेअर केला आहे.
शाकिबने १२ डिसेंबर २०१२ला उम्मी अहमद हिच्याशी लग्न केले आहे. २०१५ला त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव अलायना हसन आहे. शाकिबने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन तो दुसऱ्यांदा बाप बनणार असल्याचे सांगितले आहे. तो त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेला होता. पण कोरोनामुळे त्याला १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागले. यादरम्यान, त्याने पत्नी आणि मुलीपासून लांब रहावे लागत असल्याचे सांगत, मुलीचा फोटो शेअर केला होता.
शाकिबने घरी पोहोचल्यानंतर पत्नी उम्मीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय त्याने अलायना हिचा फोटोही शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, आयसीसीने लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाकिब अल हसनवर एक वर्षांची बंदी घातली आहे. शाकिबला फिक्सिंगसाठी एका बुकीने संपर्क साधला होता. शाकिबने ही ऑफर नाकारली. पण त्याने माहिती कळवली नसल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - भारत-पाक मालिकेवरुन शोएबचा कपिल देव यांना टोला, म्हणाला...
हेही वाचा - धोनी अडकलाय, त्याने विश्वकरंडकानंतरच निवृत्ती घ्यायला हवी होती, पाक क्रिकेटपटू