जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॉफ डु प्लेसिस आणि रग्बी संघाचा कर्णधार सिया कोलिसी कोरोना संकटात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी केप टाउनमध्ये गरजू लोकांना अन्न पोहोचवण्याचे काम केले असून या लोकांना आवश्यक वस्तूही दान केल्या आहेत.
डु प्लेसिसने या मदतीसाठी कोलीसीचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, ''ही पोस्ट आमच्या सिया कोलिसीबद्दल नाही. राहेल कोलिसी आणि कोलीसी फाऊंडेशनला मला धन्यवाद द्यायचे आहेत, जे लोकांना मदत करण्याचे अद्भूत काम करतात."
तो पुढे म्हणाला, "आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद. जेणेकरून यावेळी आपण गरजू लोकांना मदत करू शकू. काल आपल्याला अशी लोकं दिसली ज्यांनी समाज बदलण्याचा प्रयत्न केला. ते नायक आहेत."