ETV Bharat / sports

कोरोना इफेक्ट : १४ खेळाडूंनी पीएसएल लीग मध्यातच सोडून गाठलं घर

याविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'प्रत्येक खेळाडूला स्पर्धा अर्ध्यातून सोडून परत जाण्याचा अधिकार आहे.

coronavirus effect : PSL condensed after 14 foreign players pull out
कोरोना इफेक्ट : १४ खेळाडूंनी पीएसएल लीग मध्यातून सोडत गाठलं घर
author img

By

Published : Mar 15, 2020, 5:48 PM IST

कराची - कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील १४ परदेशी खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यातून सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आपले घर गाठणे पसंत केले आहे.

याविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'प्रत्येक खेळाडूला स्पर्धा अर्ध्यातून सोडून परत जाण्याचा अधिकार आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे इंग्लंडच्या काही खेळाडूंनी आपल्या संघमालकांना आम्ही परत जाणार असल्याचे कळवले आहे.'

  • 🚨 IMPORTANT ANNOUNCEMENT 🚨

    Given the unprecedented situation today PCB has decided that teams will be allowed to bring in local players as replacements for foreign players.

    Going forward teams may also play up to 4 foreign players, with no bar on the minimum number.#HBLPSLV

    — PakistanSuperLeague (@thePSLt20) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे खेळाडू आपल्या घरी परतणार -

अ‌ॅलेक्स हेल्स (कराची किंग्ज), रेले रुसो आणि जेम्स विंस (मुल्तान सुल्तांस), टॉम बॅटन, कार्लोस ब्रॅथवेट, लियाम डॉसन, लुईस ग्रेगरी, लियाम लिविंगस्टोन (पेशावर झल्मी), जेसन रॉय, टायमल मिल्स (क्वेटा ग्लॅडिएटर्स), कॉलिन मुन्रो, दाविद मालन आणि ल्यूक राँची (इस्लामाबाद यूनाइटेड) या खेळाडूंनी पीएसएल अर्ध्यातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डेन स्टेननेही आपण पीएसएल सोडणार असल्याचे ट्विट केले आहे.

कोरोनाच्या धोक्यामुळे, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे उर्वरित सामने विनाप्रेक्षक घेणार असल्याचे पाकिस्तान बोर्डाने जाहीर केलं आहे. तर अंतिम सामना २२ मार्च ऐवजी १८ मार्चला घेतला जाईल, असेही पीसीबीने सांगितलं आहे.

चीनपासून सुरूवात झालेल्या कोरोना विषाणूचा फैलाव जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. या विषाणूमुळे जगभरातील ५ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही याचा प्रसार झाला असून १०० हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या विषाणूच्या फैलावामुळे अनेक स्पर्धा रद्द तसेच काही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत.

हेही वाचा - कोरोनाच्या धोक्यामुळे सर्व बॅडमिंटन स्पर्धा स्थगित, बीडब्ल्यूएफचा निर्णय

हेही वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; पोर्तुगालमधील हॉटेल्स उपचारांसाठी केली खुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.