नवी दिल्ली - हारकर जितने वाले को बाजीगर कहते है...शाहरुखच्या चित्रपटातील हा डायलॉग, आयसीसी २०१९ विश्वकरंडाच्या अंतिम सामन्यात तंतोतंत लागू पडेल, हे आधी कुणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. पण, विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात 'न भूतो न भविष्यति' असं नाट्य घडलं. या नाट्याचा नायक होता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन. भलेही विश्वकरंडकाचा किताब इंग्लंडने आपल्या नावे केला. पण, क्रिकेटच्या कोट्यवधी चाहत्यांच्या ह्रदयाच्या विश्वकरंडकावर नाव कोरुन केन विल्यमसन खऱ्या अर्थाने 'बाजीगर' ठरला. 'शून्य' धावाने विश्वकरंडकाला मुकलेला कर्णधार, अशी इतिहासात नोंद असलेल्या केन विल्यमसनचा आज वाढदिवस. त्यानिमित्त 'ई टीव्ही' भारतने त्याच्या कामगिरीचा घेतलेला आढावा..
केन स्टुअर्ट विल्यमसन असे केनचे पूर्ण नाव. न्यूझीलंडच्या तौरंगामध्ये ८ ऑगस्ट १९९० मध्ये केनचा जन्म झाला. २९ वर्षीय केन उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. तो क्षेत्ररक्षण करताना चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर धावून जातो.
-
Captain. Leader. Kane Williamson.
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Happy birthday, skipper! 🧡#HappyBirthdayCaptainKane #OrangeArmy #RiseWithUs pic.twitter.com/PChbBblqFB
">Captain. Leader. Kane Williamson.
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2019
Happy birthday, skipper! 🧡#HappyBirthdayCaptainKane #OrangeArmy #RiseWithUs pic.twitter.com/PChbBblqFBCaptain. Leader. Kane Williamson.
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2019
Happy birthday, skipper! 🧡#HappyBirthdayCaptainKane #OrangeArmy #RiseWithUs pic.twitter.com/PChbBblqFB
केन कोणकोणत्या संघासाठी मैदानात उतरला -
केन विल्यमस न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय संघाबरोबर बारबाडोस ट्रिडेंट्स, ग्लुस्टरशायर, ग्लॉस्टरशायर २ इलेव्हन, न्यूझीलंड अंडर-१९, उत्तर जिल्हा, सनराईज हैदराबाद, यॉर्कशायर या संघाचा सदस्य राहिला आहे.
केन विल्यमसनने न्यूझीलंड संघाकडून ७२ कसोटी सामने, १४९ एकदिवसीय सामने आणि ५७ टी-२० सामने खेळले आहेत. तर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याने ४१ सामने खेळले आहेत.
कसोटीची आकडेवारी -
केनने ७२ कसोटी सामन्यातील १२७ डावांमध्ये खेळताना ५१.६८ च्या सरासरीने ६१३९ धावा केल्या आहेत. यामध्ये २० शतके, ३० अर्धशतके आणि २ द्विशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २४२ इतकी आहे.
एकदिवसीय आकडेवारी -
एकदिवसीय आकडेवारी पाहायची झाल्यास, त्याने १४९ सामन्यातील १४२ डावांमध्ये खेळताना ४७.९१ च्या सरासरीने ६१३३ धावा केल्या आहेत. यात १३ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या १४८ इतकी आहे.
टी-२० आकडेवारी -
केनने टी-२० च्या ५७ सामन्यापैकी ५५ डावांमध्ये खेळताना ३१.३५ च्या सरासरीने १५०५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ९ अर्धशतके ठोकली आहेत. केनची आयपीएलची आकडेवारी पाहिल्यास ४१ सामन्यात १३०२ धावा केल्या असून यामध्ये १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
गोलंदाज केन -
गोलंदाजीतही केन संघासाठी हरफनमौला गोलंदाज ठरला आहे. केनने कसोटीमध्ये २९, एकदिवसीय सामन्यात ३७ आणि टी-२० सामन्यात ६ गडी बाद केले आहेत.
शांत आणि संयमी अशी क्रिकेट जगतात ओळख निर्माण केलेल्या, केनने विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यानंतर दिलेली प्रतिक्रिया त्यांच्याविषयी खूप काही सांगून जाते. 'शून्य' धावांनी पराभूत झाल्यानंतरही हसत तो म्हणाला, 'मला माहित नाही इंग्लंडचा संघ कसा जिंकला, कशामुळे जिंकला. मात्र, कोणत्या तरी एका संघाला विश्वकरंडक जिंकायचाच होता. विश्वकरंडक आम्ही जिंकू शकलो नाही, मी दुःखी आहे. पण, इंग्लंडने सामन्यात चांगला खेळ केला, यामुळं ते विजयाचे मानकरी होते'.