लंडन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघातील प्रतिष्ठित अॅशेस मालिका २-२ ने बरोबरी सुटली. अखेरचा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यात इंग्लंडला यश आले तरी, मालिकेतील इंग्लंडची कामगिरी खराब ठरली. यामुळे इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. त्याचा शोध संपला असून त्यांनी बेलिस यांच्या ठिकाणी ख्रिस सिल्वरवूड यांची नियुक्ती करण्याच्या निर्णय घेतला आहे.
ट्रेवर बेलिस यांच्या राजीनाम्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका बजावत असलेल्या सिल्वरवूड यांना मुख्य प्रशिक्षकपदावर बढती दिली. आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि २०११ साली भारताला विश्वकरंडक जिंकवून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांचे नाव या यादीत आघाडीवर होते. मात्र, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सिल्वरवूड यांना पसंती दिली.
सिल्वरवूड यांच्या नावाची घोषणा इंग्लंड बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. यामुळे आता इंग्लंडचा संघ सिल्वरवूड यांच्या मार्गदर्शनात कशी कामगिरी करतो, हे पाहवे लागेल. दरम्यान, शर्यतीत असलेल्या कर्स्टन यांची प्लॅनिंग इंग्लंड बोर्डाला आवडली नाही. यामुळे त्यांच्या नाव शर्यतीतून मागे पडल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - अजिंक्य रहाणेने शेअर केला नन्ही परीसोबतचा 'क्युट' फोटो, पाहाच एकदा
हेही वाचा - धोनी सध्या काय करतो...! व्हिडिओ पाहा आणि तुम्हीच ठरवा